खानापूर तालुक्यातील सरपंच पदाच्या सोडती प्रक्रिया वेळी प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल, तहसीलदार योगेश टोम्पे, गतविकास अधिकारी डॉ.संताजी पाटील (Pudhari File Photo)
सांगली

Khanapur Sarpanch Reservation | डबल आरक्षण सोडतीतही नागेवाडीला अनुसूचित जमातीसाठी सरपंचपद राखीव

2025 Gram Panchayat Reservation | ६४ ग्रामपंचायतीच्या आरक्षण सोडती जाहीर

पुढारी वृत्तसेवा

Double Lottery Sarpanch Seat

विटा : खानापूर तालुक्यात न्यायालयाच्या निर्णयानुसार डबल म्हणजे दुसऱ्यांदा आरक्षण सोडत काढण्यात आली तरीही अनुसूचित जमातीसाठी नागेवाडी गावचे सरपंचपद राखीव तर पळशी ग्रामपंचायत सलग तिसऱ्या वेळा महिला राखीव पडले. तालुक्यातील एकूण 64 ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली.

दरम्यान, प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल, तहसीलदार योगेश टोम्पे, गटविकास अधिकारी संताजी पाटील, नायब तहसीलदार डॉ.विजय साळुंखे, अभिजित हजारे आणि पोलीस उपनिरीक्षक जालिंदर पळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही आरक्षण सोडत प्रक्रिया निर्विवाद पार पडली.

खानापूर तालुक्यातील ६४ गावच्या ग्रामपंचाय तीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत प्रक्रिया आज मंगळवारी पार पडली. यावेळी विविध गावचे सरपंच, उपसरपंच आणि पदाधिकारी यांच्या सह प्रमुख राजकीय पक्षांचे मंडळी उपस्थित होते.

तालुक्यातील विविध गावचे सरपंच पदाचे आरक्षण पुढीलप्रमाणे

  • अनुसूचित जाती महिला प्रवर्ग - गोरेवाडी, देवनगर,ताडाचीवाडी, तांदळगाव, धोंडेवाडी ऐवजी ताडाचीवाडी येथे आले.

  • अनुसूचित जाती प्रवर्ग - जाधववाडी, धोंडगेवाडी, धोंडेवाडी, शेडगेवाडी, माधळमुठी.

  • अनुसूचित जमाती (महिला) - नागेवाडी,

  • नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) - आळसंद, बामणी, ऐनवाडी , कार्वे, जाधवनगर, कमळापूर, घानवड, पोसेवाडी, सांगोले, वाळूज,

  • नागरिकांचा मागास प्रवर्ग - जाधवनगर , घोटी खुर्द, रामनगर , चिंचणी, वाझर, राजधानी भेंडवडे, कार्वे, बानुरगड.

  • सर्वसाधारण महिला - बलवडी खा, बेणापूर, भडकेवाडी, भाळवणी, भेंडवडे, भूड, करंजे, चिखलहोळ, जखिनवाडी, जोंधळखिंडी, माहूली, मेंगाणवाडी, पळशी, पंचलिंगनगर रेवणगाव, वलखड, वासुंबे आणि पारे.

  • सर्वसाधारण - कुर्ली, लेंगरे, खंबाळे, मोही, पारे, रेणावी, साळशिंगे, वेजेगाव, सुलतानगादे, गार्डी, भाग्यनगर, भांबर्डे, भिकवडी बु, हिंगणगादे , हिवरे, कळंबी, बलवडी भा. , देवीखिंडी, घोटी बु.

अशा पद्धतीने ६४ गावांच्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडत आज झाली. साळशिंगे येथील रुद्र संतोष मोहिते या सहा वर्षीय मुलाच्या हस्ते आरक्षित गावच्या सरपंच पदाच्या चिठ्ठ्या उचलण्यात आल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT