Doctor jailed in woman’s death
विटा : प्रसूतीच्या वेळेस महिलेला योग्य उपचार दिले नाहीत शिवाय वेळेत पुढील उपचारासाठी ही पाठवले नाही. परिणामी महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत खानापुरा तील डॉ. उदयसिंह विजयसिंह हजारे यांना विटा न्यायालयाने दोन वर्ष सक्त मजूरीची शिक्षा सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कवठे महांकाळ तालुक्यातील रांजणी येथील सविता संदीप पवार (वय २३) या महिलेला प्रसुती कळा सुरू असताना ११ नोव्हेंबर २०१७ रोजी दुपारी खानापूर तालुक्यातील करंजे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिची एकूणच प्रकृतीची नाजूक अवस्था पाहून, तिच्या नातेवाईकांनी करंजे गावाजवळील खानापूर येथील हजारे हॉस्पिटल येथे सविता पवार हिला दाखल केले होते.
प्रसुती कळा सुरू असताना उपलब्ध सुविधा आवश्यक कौशल्य यांचा विचार करून योग्य वेळी तिला पुढील उपचारकामी पाठवणे आवश्यक असताना त्याठिकाणी हॉस्पिटलचे उदयसिंह हजारे यांनी निष्काळजीपणा दाखविला. त्यामुळे सांगलीतील शासकीय रुग्णाल यात पोहचण्यास उशीर झाला. त्यामुळे तिथे व्यवस्थित उपचार न देता आल्याने सविता पवार हिचा मृत्यू झाला.
याबाबत संबंधित डॉक्टरांच्या वर हलगर्जीपणाबद्दल तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकाराची जिल्हा शल्य चिकीत्सक आणि सांगलीतील शासकीय सर्वोप चार रुग्णालयातील तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यां ची चौकशी समिती नेमण्यात आली होती.
या समितीच्या दि.२६ मार्च २०१९ रोजीच्या अहवा लानुसार डॉ उदयसिंह हजारे (वय ४९) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर आज गुरुवारी विटा न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी २ वर्षे सक्तमजुरी आणि २५ हजार रुपये दंड आणि हा दंड न भरल्यास आणखी एक महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. सरकारी वकील म्हणून एस.एस. यादव आणि व्ही.एस. कोकाटे यांनी काम पाहिले.