सांगली

यवतमाळ जिल्ह्यातील मुकादमांचा आटपाडीच्या एकाला पावणे पाच लाखांना गंडा

backup backup

विटा, पुढारी वृत्तसेवा : ऊस तोडणीसाठी मजूर पुरवितो, असे सांगून यवतमाळ जिल्ह्यातील तीन मुकादमांनी आटपाडीतील आबासो खंडू बोडरे (वय ४७, काळेवाडी) यांची तब्बल ४ लाख ७३ हजाराची फसवणूक केली आहे. या प्रकरणी आकाश गुलाब राठोड ( वय २४), अतुल विठ्ठल राठोड (२०, दोघेही कुपरा बुद्रुक, ता. पुसद), सुरज गणेश जाधव (२६, उटी, ता. महागाव) या तीन मुकादमांच्या विरुद्ध विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,

याबाबत विटा पोलिसांनी सांगितले की, आकाश राठोड गुलाब राठोड आणि सुरज जाधव हे तीन यवतमाळ जिल्ह्यातील मुकादम आटपाडी तालुक्यातील आबासो बोडरे यांना आळसंद (ता.खानापूर) येथील राजाराम बजरंग शिरतोडे यांच्या घरी भेटले. या मुकादमांनी आम्ही तुम्हाला ऊस तोडणीसाठी मजूर पुरवितो, असे सांगून बोडरे यांच्याकडून नोटरी करून घेतली त्यामुळे त्यांचा विश्वास या तिघांवर बसला. त्यानंतर बोडरे यांनी ५ जुलै २०२२ ते आजपर्यंत वेळो वेळी फोन पे, गुगल पे, नेट बँकिंग तसेच रोख असे एकूण ४ लाख ७३ हजार रुपये या तिघांना दिले. त्यानंतर मजुरांच्या बाबत विचारणा केली असता तिन्ही मुकादमांनी ऊस तोडणी मजूर देणार नाही, असे म्हणत शिवीगाळ आणि दमदाटी केली असे बोडरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत हवालदार विक्रम गायकवाड अधिक तपास करीत आहेत.

हेहीव वाचलंत का?

SCROLL FOR NEXT