डॉ. पतंगराव कदम यांच्या ‘लोकतीर्थ’ स्मारकाचे थ्रीडी डिझाईन. Pudhari Photo
सांगली

डॉ. पतंगराव कदम यांचे लोकतीर्थ स्मारक ऊर्जा, प्रेरणा देणारे

पुढारी वृत्तसेवा

कडेगाव : पुढारी वृत्तसेवा

डॉ. पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखान्याच्या परिसरातील दहा एकर जागेवर काँग्रेसचे नेते, भारती विद्यापीठाचे संस्थापक-कुलपती, माजी मंत्री, आमदार डॉ. पतंगराव कदम यांचा पूर्णाकृती पुतळा व दिमाखदार ‘लोकतीर्थ’ स्मारक साकारले आहे. हे स्मारक सर्वांसाठी ऊर्जा आणि प्रेरणादायी ठरणार आहे. गुरुवार, दि. 5 सप्टेंबर रोजी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्याहस्ते पुतळा अनावरण व या स्मारकाचे लोकार्पण होणार आहे. त्याची जय्यत तयारी सुरू आहे.

डॉ. पतंगराव कदम यांनीच स्थापन केलेल्या सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात दहा एकर जागेवर दिमाखदार स्मारक साकारले गेले आहे. स्मारकाच्या प्रवेशद्वारातच स्वागत कक्ष व आकर्षक स्वागत कमान उभारण्यात आली आहे. येथून स्मारक परिसरात जाताना आधुनिक पद्धतीचे स्वच्छ व सुंदर रस्ते, रस्त्यालगत फूलझाडे आहेत. समोरच काही अंतरावर आकर्षक विठ्ठल-रुक्मिणी, तुळजाभवानी व श्री गणेश अशी मंदिरे उभारण्यात येत आहेत. या तिन्ही मंदिरांवर कोरीव नक्षीकाम केले आहे.

स्वागत कमानीतून पुढे उजवीकडे डॉ. पतंगराव कदम यांचे स्मारक व 18 फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा उभारला आहे. या स्मारकस्थळाकडे जाताना दुतर्फा वाहते पाणी, कारंजे, फूलझाडे, दोन्ही बाजूला विस्तीर्ण हिरवाई साकारली आहे. स्मारकस्थळाच्या बाजूने वस्तुसंग्रहालयाकडे जाण्याचा मार्ग आहे. परिसरातील सजावट पाहून मनाला प्रसन्नता लाभते. आग्नेय दिशेला सोनहिरा कारखाना, पश्चिमेला दिसणार्‍या डोंगररांगा, स्मारकाच्या मागील बाजूस असलेला छोटासा नैसर्गिक तलाव असे वातावरण मनाला मुग्ध करून टाकते.

स्मारक अधिकाधिक लोकोपयोगी होण्यासाठी प्रयत्न

अतिशय नयनरम्य असे ‘लोकतीर्थ’ स्मारक उभारण्यात आले आहे. डॉ. पतंगराव कदम यांचे हे स्मारक अधिकाधिक लोकोपयोगी आणि अभिजात करण्याच्यादृष्टीने त्यांचे पुत्र आमदार डॉ. विश्वजित कदम व त्यांच्या कुटुंबीयांनी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT