सांगली

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय देशासाठी दिशादर्शक : विश्वजित कदम

backup backup

कडेगांव, पुढारी वृत्तसेवा : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस पक्षाने दाखवलेले एकजूट प्रचाराची आक्रमक रणनीती आणि कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत या त्रिसूत्रीच्या जोरावर काँग्रेसने विजयश्री खेचून आणली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय देशासाठी दिशादर्शक ठरेल. केंद्र आणि राज्य सरकार विरोधातील असंतोष मतदारांनी आपल्या मतदानातून व्यक्त केला. अशी प्रतिक्रिया माजी कृषी व सहकार मंत्री डॉ विश्वजित कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

डॉ विश्वजित कदम म्हणाले, कर्नाटक मधील विजय हा काँग्रेसची एकजूट, यशस्वी रणनीती आणि कार्यकर्त्यांची मेहनतमुळे निर्णायक ठरली आहे. महागाई, बेरोजगारी, भाजप राज्य सरकारचा भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या समस्या अशा परिस्थितीत देशातील जनता पिचून गेली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या अन्यायकारक धोरणांच्या विरोधात जनतेमध्ये असलेला प्रचंड रोष प्रचारादरम्यान मला जाणवत होता. या निकालामधून तोच असंतोष मतदारांनी व्यक्त केला आहे. संपूर्ण देशासाठी हा निकाल दिशादर्शक ठरणार आहे.

आमच्या नेत्या खा सोनियाजी गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेली प्रचाराची रणनीती यशस्वी ठरली. त्याचप्रमाणे, काँग्रेसचे कर्नाटक अध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांनी देखील कर्नाटकच्या विजयामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण देशभर नवी क्रांती उभारणाऱ्या आदरणीय राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वावर देखील कर्नाटकच्या निकालाने शिक्कामोर्तब केले आहे.

पुढे ते म्हणाले ,कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचाराची जबाबदारी मला सोपवण्यात आली होती. त्यामुळेच काँग्रेसच्या यशामध्ये भूमिका निभवता आल्याबद्दल मला सार्थ अभिमान वाटतो. कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचारदरम्यान बेंगळुरू शहरातील राजाजी नगर, बेळगाव जिल्ह्यातील खानापूर आदी अनेक मतदारसंघांमध्ये प्रचार केला. कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार, विद्यमान आमदार प्रियांक खर्गे आदिंसमवेत सभा घेतल्या. प्रचार फेरी काढली आणि अगदी हाऊस टू हाऊस प्रचार केला. त्याचप्रमाणे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमवेत बूथ रचना आणि निवडणूक प्रचार यंत्रणेचा वेळोवेळी आढावा देखील घेतला.

हेही वाचंलत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT