सांगली : हसनी आश्रम परिसरात महिलेचे दागिने जबरदस्तीने चोरणार्‍या चोरट्याला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली.  PUdhari Photo
सांगली

चेन स्नॅचिंग करणार्‍या सराईताला अटक

पुढारी वृत्तसेवा

सांगली : पुढारी वृत्तसेवा

विश्रामबाग परिसरातील हसनी आश्रम येथे चालत निघालेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ चोरणार्‍या सराईताला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. हबीब दिलावर शेख (वय 19, रा. हनुमाननगर, सांगली) असे चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून सोन्याचे दागिने व मोटरसायकल असा सव्वालाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

फिर्यादी रंजना रमेश पाटील (रा. श्रीरामनगर, विजयांश रेसिडेन्सी, वानलेसवाडी, सांगली) या दि. 22 रोजी 5 च्या सुमारास दत्त मंदिरामध्ये गेल्या होत्या. तेथून त्या बहीण सरस्वती पाटील यांच्याकडे चालत निघाल्या होत्या. रंजना या हसनी आश्रम येथील शारदा नेट दुकानासमोर आल्या असता दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 25 हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन हिसडा मारुन लंपास केली होती.

या जबरी चोरीचा तपास करत असताना हेड कॉन्स्टेबल बिरोबा नरळे, महंमद मुलानी, योगेश पाटील, आर्यन देशिंगकर यांनी तांत्रिक माहितीच्या आधारावर व खबर्‍यामार्फत मिळालेल्या माहितीवरून हबीब शेख याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने चेन चोरीचा गुन्हा कबूल केला. त्याच्याकडून चोरीतील सोन्याची माळ व मोटरसायकल असा सव्वालाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक संजय अस्वले तपास करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT