Bus service has been stopped in some areas due to flood situation.
पूरस्थितीमुळे काही भागातील बससेवा थांबवली आहे. Pudhari File photo
सांगली

सात पुलावर आले पाणी; बससेवा थांबवली

पुढारी वृत्तसेवा

सांगली : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील सात पुलावर पाणी आल्याने यामार्गावरील बस वाहतूक गुरुवारी बंद करण्यात आली. काही गावासाठी अन्य मार्गावरून बस वाहतूक वळविण्यात आली आहे. जवळपास बारा ते पंधरा बससेवा रद्द करण्यात आली असण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील विटा, इस्लामपूर, शिराळा पलूस आगारातून सुटणार्‍या काही बसची सेवा थांबविण्यात आली. इस्लामपूर-कोडोली मार्गावरील ऐतवडे पुलावर पाणी आल्याने ही बस सेवा पूर्ण रद्द करण्यात आली आहे. विटा-कडेगाव मार्गावरील रामापूर पुुलावर पाणी आल्याने या मार्गावरील बस सेवा बलवली फाटा रामापूर या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. शिराळा-कांडवण मार्गावरील आराळा-शित्तूर पुलावर पाणी आल्याने या मार्गावर आता मणदूरपर्यंत बस सोडण्यात आली आहे. शिराळा-बांबवडे मार्गावरील सागाव पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील बससेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. पलूस-कोल्हापूर मार्गावरील आमणापूर ते अंकलखोप पुुलावर पाणी आल्याने यामार्गावरील वाहतूक आता इस्लामपूर व सांगली मार्गे वळवण्यात आली आहे.

SCROLL FOR NEXT