सांगली

सांगली : दरीकोनूर येथे सेवानिवृत्त पोलिसाच्या घरी चोरी; चार लाखांचा ऐवज लंपास

backup backup

जत; पुढारी वृत्तसेवा : दरीकोनूर ( ता.जत) येथे भरदिवसा एका सेवानिवृत्त पोलिसाच्या घरातून चोरट्यांनी चार लाखांचा ऐवज लंपास केला. या चोरीत एक लाख रुपये रोख, तीन लाखाचे दागिने असा एकूण ४ लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. या घटनेनंतर श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. या घटनेचा तपास पोलीस कसून करत आहेत. जवळच्या व्यक्तीनेच चोरी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

याबाबत अधिकची माहिती अशी की, दरीकोनूर येथील सायबण्णा मलगौंडा पाटील हे सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी आहेत. सिद्धनाथ रोडला त्यांचे घर आहे. गुडीपाडव्या दिवशी घरातील काम आटोपून घरासमोरील शेतात सर्वजण गेले होते. याचाच फायदा उचलत अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील रोख एक लाख रुपये व तीन लाख किमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण चार लाखांचा ऐवज लंपास झाला आहे. या घटनेचा तपास स.पो.नि जगताप करत आहेत.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT