भाजपमधील पेच अखेर सुटला; उमेदवार निश्चित 
सांगली

Sangli Election : भाजपमधील पेच अखेर सुटला; उमेदवार निश्चित

महायुती तुटली; शिवसेनेबरोबरची बोलणी फिस्कटली

पुढारी वृत्तसेवा

सांगली : महापालिका निवडणुकीसाठी भाजपमधील पेच अखेर सुटला. भाजपचे उमेदवार निश्चित झाले आहेत. संबंधित सर्व उमेदवारांना भाजप नेत्यांकडून अर्ज भरण्याबाबत सूचना केल्या आहेत. दरम्यान, महायुतीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेनेबरोबरची बोलणी फिस्कटली आहेत. राष्ट्रवादीने तर यापूर्वीच सवतासुभा घेतला आहे. त्यामुळे महायुती फिस्कटली आहे. दरम्यान, विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्ष, तसेच राष्ट्रवादी आणि शिवसेनेने भाजपमधील नाराजांभोवती गळ टाकण्यास सुरुवात केली आहे.

भाजपमधील गट-तट, अंतर्गत कलह तसेच शिवसेनेबरोबर सुरू असलेली बोलणी यामुळे उमेदवारी यादी निश्चित होण्यास विलंब होत होता. अखेर रविवारी भाजप-शिवसेना युती तुटली. मात्र भाजपमधील अंतर्गत कलहावर तोडगा निघाला. काही उमेदवारांची अदलाबदल झाली आणि भाजपचे उमेदवार निश्चित झाले. आरपीआय आठवले गटाला एक जागा देण्यात आली. दरम्यान, जनसुराज्य शक्ती पक्षाला प्रभाग क्रमांक 5 आणि 20 मध्ये एकूण तीन जागा मिळाल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, भाजपने उमेदवारी यादी निश्चित केली आहे. मात्र उमेदवारांची नावे अधिकृतपणे जाहीर केलेली नाहीत. उमेदवारी निश्चित झालेल्यांना फोनवरून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासंदर्भात निरोप दिले जात होते. प्रभाग क्रमांक पंधरा वगळता अन्य प्रभागांमधील भाजप उमेदवारांची नावे बऱ्यापैकी स्पष्ट झाली. या नावांना भाजपमधील सूत्रांनी बऱ्यापैकी दुजोरा दिला आहे.

भाजप-शिवसेना युती व्हावी, यासाठी भाजप आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते आग्रही होते. मात्र स्थानिक स्तरावर युती आकार घेत नव्हती. शिवसेनेने भाजपकडे तेरा जागांची मागणी केली होती. ही मागणी दहावरून नंतर सात जागांवर आली. मात्र रविवारी जागावाटपाबाबत चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या. भाजप नेते जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेनेचे नेते मंत्री शंभूराज देसाई यांच्यात चर्चा झाली. मात्र बोलणी यशस्वी झाली नाही. त्यामुळे स्थानिक स्तरावर शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीशी चर्चा होऊ शकते, असेही स्थानिक नेत्यांनी सांगितले.

शिवसेना नेते आमदार सुहास बाबर म्हणाले, शिवसेनेला आठ जागा मिळतील, असे वाटत होते. शनिवारी रात्री तशी चर्चा झाली होती. मात्र मोहन वनखंडे, सूर्यवंशी, मुग्धा गाडगीळ हे उमेदवार नकोत, अशा अटी भाजपकडून घातल्या जात होत्या. अखेर भाजपसोबतची बोलणी फिस्कटली आहे. महापालिकेत शिवसेना स्वबळावर लढणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले आहे. महापालिका निवडणूक महायुती म्हणून लढवली जाणार असल्याचे भाजपकडून सांगितले जात होते. मात्र घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादीने यापूर्वीच सवतासुभा घेतला आहे. शिवसेनाही महायुतीतून बाहेर पडली आहे. दरम्यान, भाजपमधील नाराजांवर काँग्रेस, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्ष व शिवसेनेचे लक्ष आहे. बंडखोरी, पळवापळवी होऊ नये, यासाठी भाजपकडूनही विशेष दक्षता घेतली जात आहे.

भाजप उमेदवारांना उद्या एबी फॉर्म

भाजप उमेदवारांची यादी आज, सोमवार, दि. 29 डिसेंबर रोजी प्रसिद्ध होईल. मात्र उमेदवारांना एबी फॉर्म मंगळवार, दि. 30 रोजी दिले जाणार आहेत. महायुतीचे घटकपक्ष असलेल्या जनसुराज्यला दोन ते तीन जागा, आरपीआयला 1 जागा देण्यात आली आहे. मात्र जनसुराज्य, आरपीआयसह सर्व 78 जागा भाजपच्या चिन्हावर लढवल्या जाणार आहेत, अशी माहिती भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी दिली.

भाजपचे संभाव्य उमेदवार...

प्रभाग क्रमांक 1 : ऋषिकेश सूर्यवंशी, पद्मश्री पाटील, रवींद्र सदामते, माया गडदे.

प्रभाग क्रमांक 2 : प्रकाश ढंग, प्रकाश पाटील, प्राजक्ता धोत्रे, मालुश्री खोत.

प्रभाग क्रमांक 3 : संदीप आवटी, सुनीता व्हनमाने, शशिकांत दोरकर, छाया जाधव.

प्रभाग क्रमांक 4 : निरंजन आवटी, विद्या गायकवाड, अपर्णा शेटे, मोहन वाटवे.

प्रभाग क्रमांक 7 : गणेश माळी, दया खोत, बानू जमादार, शुभांगी देवमाने (जनसुराज्य).

प्रभाग क्रमांक 8 : संजय पाटील, दीपक वायदंडे, योगिता राठोड, मीनाक्षी पाटील.

प्रभाग क्रमांक 9 : संतोष पाटील, वर्षा सरगर, रोहिणी पाटील, अतुल माने.

प्रभाग क्रमांक 10 : जगन्नाथ ठोकळे, रिद्धी म्हामूलकर, प्रकाश मुळके, गीता पवार.

प्रभाग क्रमांक 11 : मनोज सरगर, सविता रूपनूर, शुभांगी साळुंखे, संजय कांबळे.

प्रभाग क्रमांक 12 : धीरज सूर्यवंशी, लक्ष्मी सरगर, संजय यमगर, वसीम शिकलगार.

प्रभाग क्रमांक 13 : मीनल पाटील, अनुराधा मोहिते, महाबळेश्वर चौगुले.

प्रभाग क्रमांक 14 : विजय साळुंखे, उदय बेलवलकर, अनिता पवार, मनीषा कुकडे.

प्रभाग क्रमांक 16 : उत्तम साखळकर, ॲड. स्वाती शिंदे, विद्या दानोळे, प्रदीप बन्ने.

प्रभाग क्रमांक 17 : लक्ष्मण नवलाई, गीतांजली ढोपे-पाटील, मालन गडदे, प्रशांत पाटील.

प्रभाग क्रमांक 18 : शैलेश पवार, बिस्मिल्ला शेख, गाथा काळे, वैशाली गवळी.

प्रभाग क्रमांक 19 : सविता मदने, संजय कुलकर्णी, अलका ऐवळे, कीर्ती देशमुख.

प्रभाग क्रमांक 20 : योगेंद्र थोरात, स्वाती पारधी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT