MLA Gopichand Padalkar 
सांगली

Dhangar reservation : धनगर आरक्षणावरून मुख्यमंत्र्यांना पडळकरांचा इशारा

मोहन कारंडे

आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : धनगर आरक्षणासाठी तात्काळ पाऊले न उचलल्यास धनगर समाजाच्या आंदोलनास मुख्यमंत्री शिंदे यांना सामोरे जावे लागेल, असा इशारा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या : 

पडळकर म्हणाले, धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबाजवणीसाठी शासनाने ५० दिवसांची मुदत दिली होती. शुक्रवारी ही मुदत संपली आहे. परंतु अद्याप या मुद्द्यावर शासकीय पातळ्यांवर काहीही ठोस हालचाल दिसत नाही. फक्त विशिष्ट समाजासाठी आपली वाट्टेल ते करायची तयारी आहे, अशी धारणा बहुजन समाजाची आपल्या बद्दल होत आहे, असे पडळकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना म्हटले आहे.

आघाडी सरकारने आरक्षण नाकारुन धनगर समाजावर अन्याय केला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या महायुती सरकारच्या नेतृत्त्वात धनगर आरक्षण अंमलबाजवणी होइल, ही आशा सामान्य धनगर बांधवांना आहे. मात्र, त्यांच्याकडूनही निराशा पदरी पडत आहे. सध्या शासनाच्या धनगर समाजाच्या उद्धारासाठी सुरु असलेल्या योजना बंद आहेत. आमच्या आठही मागण्यांच्या अंमलबजावणीची तात्काळ गरज आहे. केवळ विविध समित्या गठित करून धनगर समाजाच्या पदरात काहीही पडणार नाही. ही भावना समान्य धनगरांच्या मनात निर्माण होते आहे. आपण वेळेत योग्य पावलं उचलावीत व धनगर आरक्षणाचा मुद्दा निकालात काढावा. अन्यथा धगनर समाजाच्या आंदोलनाच्या रोषाला सामोरं जाण्याची तयारी शासनाने ठेवावी, असा इशारा पडळकर यांनी धनगर समाजाच्यावतीने शासनाला दिला आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT