Meeting of National Egg Coordinating Committee
राष्ट्रीय अंडी समन्वय समितीची बैठक Pudhari Photo
सांगली

दक्षिण महाराष्ट्रातील अंडी दराबद्दल मोठी अपडेट

पुढारी वृत्तसेवा

विटा, पुढारी वृत्तसेवा : मिरज झोनमध्ये 13 सदस्यीय समितीची अंड्याच्या दराबाबत बैठक झाली. या बैठकीत रोजचा अंडी दर रोज सकाळी 11.30 वाजता एकमताने जाहीर करण्यात येईल असा निर्णय झालेला आहे. या दरानुसार सर्वांनी कामकाज करावे, असा कुक्कुटपालक व्यवसायिकांच्या सर्वसहमतीने ठराव पारीत करण्यात आला. देशपातळीवरच्या कुक्कुट व्यावसायिकांची प्रातिनिधीक संस्था असलेल्या राष्ट्रीय अंडी समन्वय समिती अर्थात एनईसीसीच्या मिरज झोनमधील कुक्कुट व्यावसायिकांची एक व्यापक बैठक शनिवारी (दि.6) रोजी विट्यात पार पडली.

एनईसीसीचा मिरज झोन हा कोल्हापुर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील कुक्कुट व्यावसायिकांसाठी निर्माण करण्यात आला आहे. या अंतर्गत मिरज विभागीय झोन कमिटीच्या माध्यमातून, देशांतर्गत अंडी उत्पादन, निर्यात आणि देशांतर्गत मागणीचा अभ्यास करुन अंडी दराबाबत समन्वय राखला जात असतो. या अनुषंगाने या बैठकीमध्ये मिरज झोनमधील व्यावसायिकांच्या विविध अडचणींबाबत चर्चा करण्यात आली.

यामध्ये प्रामुख्याने अंडी दराबाबतचा गैरमेळ दूर करावा आणि संपूर्ण मिरज झोनचा एकच सर्वमान्य अंडी दर दररोज जाहीर व्हावा, अशी मागणी करण्यात आली. याबाबत झोनमधील विविध ठिकाणचे अंडी उत्पादक कुक्कुटव्यावसायिक आणि अंडी व्यापाऱ्यांचा समावेश असलेली तेरा सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती बाजारपेठे ची परिस्थिती अवलोकन करुन दररोज सकाळी 11.30 वाजता एकमताने अंडी दर जाहीर करेल. सर्व व्यावसायिक आणि अंडी व्यापाऱ्यांनी या दरानुसार कामकाज करावे असा ठरावही करण्यात आला.

या बैठकीस मिरज समन्वय समितीचे समन्वयक सी.वसंत कुमार मिरज,किरण तारळेकर, झोन अध्यक्ष संजय पाटील, उपाध्यक्ष प्रशांत भोसले,सचिव वाय.आर.पाटील, सदस्य लक्ष्मणराव पाटील, शरद रावताळे, धनाजी देवकर, सुखदेव पाटील, मुकुंद लकडे, सचिन गायकवाड, अय्याज मुल्ला,संजय रावताळे, रमेश होनराव, कोल्हापूरचे विक्रम फारणे, सागर म्हेत्रे ,जयंत पाटील, चंद्रकांत जाधव, दिलीप डिसले, शिवाजी निंबाळकर, या अंडी उत्पादकांसह शहाजी गडदरे, निलेश राठोड, मिरजेचे आयलेशकुमार, महंमद बागवान हे अंडी व्यापारी आणि परिसरातील कुक्कुट व्यवसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT