भेसळयुक्त मिठाई  
सांगली

Adulterated Sweets : ग्राहकांनो सावधान... मिठाईत असू शकते भेसळ

तपासणीसाठी भरारी पथके : खरेदी करताना काळजी घेण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

सांगली : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात मिठाई खरेदी करण्यात येते. ही मिठाई खराब किंवा भेसळीची असण्याची शक्यता असते. त्या पार्श्वभूमीवर दुकाने तपासणी करण्यासाठी अन्न, औषध विभागाने पथके तयार केली आहेत. अन्न, औषध विभागाचे अधिकारी रावसाहेब समुद्रे यांनी, ग्राहकांनी मिठाई खरेदी करताना त्याची किंमत, एक्स्पायरी, गुणवत्ता याची पाहणी करून घ्यावी, असे आवाहन केले आहे.

काही वर्षांपासून दिवाळी सणाच्या निमित्ताने तयार मिठाई, फराळ खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. अनेकजण दिवाळीनिमित्त मिठाईचे तयार बॉक्स भेट देतात. दिवाळीसाठी बेकरी खाद्यपदार्थ उत्पादकांकडे मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या खाद्यपदार्थात किंवा दिवाळीनिमित्त लागणार्‍या वस्तूंमध्ये भेसळीची शक्यता असते.

प्रशासनाने गेल्या वर्षभरात अनेक कारवाया केल्या. एकूण तपासण्या 448, सुधारणा नोटीस 989, परवाना निलंबन 8, घेतलेले नमुने 332, प्रमाणित 172, असुरक्षित 12, कमी दर्जा 3, अहवाल प्रलंबित 140, तडजोड दाखल 74, तडजोड निकाली 71, दंड 730000, न्यायालयात दाखल 22, दंड 20000, इतर अन्नपदार्थ जप्त प्रकरणे 19, जप्त साठा किंमत 1,72,33,249, प्रतिबंधित अन्नपदार्थ जप्ती प्रकरणे 36, जप्त साठा किंमत 22,18,417, न्यायालयात खटले दाखल 28, अशा कारवाया करण्यात आल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT