Koyna Dam
कोयना धरणातून आणखी दहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग File Photo
सांगली

Koyna Dam | सांगलीला पुराचा धोका! कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला

shreya kulkarni

सांगली : कोयना पाणलोट क्षेत्रात अद्यापही जोरदार पाऊस सुरू आहे ‌त्यामुळे धरत भरत आले असून आता कोयना धरणातून गुरुवारपासून आणखी दहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होणार आहे. त्यामुळे कृष्णा नदीची सांगलीत पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे.

दि. २५ जुलै २०२४ रोजी सकाळी ८ वा. धरणामध्ये एकूण ७५.२६ टीएमसी ७१.५१ % पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रामधील मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी आज संध्याकाळी ४:०० वा. धरणाची वक्र दरवाजे १ फूट ६ इंच उचलून सांडव्यावरून १०००० क्युसेक्स विसर्ग सुरू करणेत येणार असून येव्यानुसार त्यामध्ये वाढ करणेत येईल.

धरण पायथा विद्युत गृहामधील १०५० क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग ११०५० क्युसेक्स असेल. कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे.

SCROLL FOR NEXT