Kolhapur Monsoon Update
राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोसळत असलेल्या दमदार पावसामुळे राधानगरी धरण 98.20 टक्के भरले आहे. Kolhapur Mansoon Update

Kolhapur Monsoon Update : राधानगरी धरण ९८.२०टक्के भरले, कोणत्याही क्षणी दरवाजे खुले होण्याची शक्यता

धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास अर्धा फूट पाणी बाकी
नंदू गुरव

राधानगरी | Kolhapur Monsoon Update : : राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोसळत असलेल्या दमदार पावसामुळे राधानगरी धरण 98.20 टक्के भरले आहे. धरण 347.50 फूट पाणी पातळी झाल्यानंतर पूर्ण क्षमतेने भरते. सध्या धारणाची पाणी पातळी 346.72 फूट झाली असूनं धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास अर्धा फूट पाणी कमी आहे. पावसाचा जोर कायम असून कोणत्याही क्षणी धरणाचे स्वयंचालित दरवाजे खुले होण्याची शक्यता आहे.

धरणातून वीजगृहासाठी 1500 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग होतं असून दरवाजे कांगुले झाल्यास विसर्गामध्ये वाढ होणार असून सध्याची पुरस्थिती पाहता नंदिकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

logo
Pudhari News
pudhari.news