सांगली : विधानसभा निवडणुकीसाठी सोमवार, दि. 28 रोजी, अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी जिल्ह्यातील सर्व 8 मतदारसंघांतील 58 उमेदवारांनी एकूण 75 उमेदवारी अर्ज दाखल केले. सांगली विधानसभेसाठी जयश्री मदन पाटील यांनी काँग्रेसकडून दोन अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज, मंगळवार, दि. 29 ऑक्टोबर हा शेवटचा दिवस आहे.
सांगली : संग्राम राजाराम मोरे (अपक्ष), पृथ्वीराज गुलाबराव पाटील (एक काँग्रेस व एक अपक्ष), आरती सर्जेराव कांबळे (बहुजन समाज पार्टी), रफीक महंमद शेख (अपक्ष), जयश्री मदन पाटील (दोन काँग्रेस), अल्लाऊद्दीन हयातचाँद काजी (वंचित बहुजन आघाडी), जयश्री अशोक पाटील (अपक्ष), इम्रान महंमद जमादार (अपक्ष).
मिरज : ज्योती जयपाल कांबळे (अपक्ष), महेशकुमार महादेव कांबळे (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन) मोहन ज्ञानोबा वनखंडे (तीन काँग्रेस, एक अपक्ष), सागर मोहन वनखंडे (एक काँग्रेस, एक अपक्ष), महेशकुमार महादेव कांबळे (अपक्ष), दीपक श्रीधर सातपुते (जनता दल, सेक्युलर) सचिन मनोहर वाघमारे (अपक्ष), डॉ. आकाश नंदकुमार व्हटकर (बहुजन समाज पार्टी), रवींद्र गोविंद कोलप (अपक्ष), तानाजी आनंदा सातपुते (शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे)
इस्लामपूर : जगन्नाथ भगवान मोरे (अपक्ष), प्रतीक जयंत पाटील (राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार गट).
शिराळा : मानसिंग फत्तेसिंगराव नाईक (दोन अर्ज ः राष्ट्रवादी - शरदचंद्र पवार गट), विराज मानसिंग नाईक (राष्ट्रवादी - शरदचंद्र पवार गट), सत्यजितराव शिवाजीराव देशमुख (चार अर्ज भाजप), हणमंतराव नामदेव पाटील (भाजप), सम्राट नानासाहेब महाडीक (अपक्ष), तेजस्वी सम्राट महाडीक (अपक्ष).
पलूस/कडेगाव : विश्वजित पतंगराव कदम (चार अर्ज काँग्रेस), अर्जुन शामराव जमदाडे (अपक्ष), रंगराव रामचंद्र पाटील (अपक्ष), आनंदा शंकर नालगे (बळीराजा पार्टी), विजय विलास यादव (अपक्ष), शकुंतला शशिकांत पवार (अपक्ष), परशुराम तुकाराम माळी (अपक्ष).
खानापूर : भरत जालिंदर पवार (अपक्ष), ब्रह्मदेव कुंडलिक पडळकर (अपक्ष), संग्राम कृष्णा माने (वंचित बहुजन आघाडी), महादेव उत्तम साळुंखे (अपक्ष), प्रकाश आबासाहेब गायकवाड (अपक्ष), अजित धनाजी खंदारे (बहुजन समाज पार्टी), वैभव सदाशिव पाटील (राष्ट्रवादी -शरदचंद्र पवार), वैभव सदाशिव पाटील (अपक्ष), सदाशिवराव हणमंतराव पाटील (राष्ट्रवादी - शरदचंद्र पवार).
तासगाव - कवठेमहांकाळ : रोहित रावसाहेब पाटील (राष्ट्रवादी पार्टी-शरदचंद्र पवार), सुमन रावसाहेब पाटील (राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार), संजय रामचंद्र पाटील (राष्ट्रवादी), प्रभाकर संजय पाटील (काँग्रेस), वैभव गणेश कुलकर्णी (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), दत्तात्रय भीमराव बामणे (अपक्ष), प्रमोद धोंडिराम देवकते (अपक्ष), प्रदीप बाळकृष्ण माने (अपक्ष), सूरज दत्तात्रय पाटील (अपक्ष), अनिल बिरू गावडे (अपक्ष), संभाजी यशवंत पाटील (अपक्ष), विक्रांतसिंह माणिकराव पाटील (अपक्ष).
जत : गोपीचंद कुंडलिक पडळकर (भाजप), प्रकाश विठोबा जमदाडे (अपक्ष), भीमगोंडा रामगोंडा बिरादार (अपक्ष), शंकर रामू वगरे (अपक्ष), लक्ष्मण गुंडा पुजारी (एक अपक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष), विक्रम दादासाहेब ढोेणे (बहुजन समाज पार्टी).
उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत मंगळवार, दि. 29 ऑक्टोबर असून, छाननी बुधवार, दि. 30 रोजी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवार, दि. 4 नोव्हेंबर आहे. दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर मतमोजणी शनिवार, दि. 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे.