40 kg fish at Mhaisal
म्हैसाळ येथे कृष्णा नदीत मच्छीमाऱ्यांच्या गळाला कोयरा जातीचा 40 किलोचा मासा लागला.  Pudhari News Network
सांगली

अबब! म्हैसाळ येथे ४० किलोचा मासा गळाला

पुढारी वृत्तसेवा

सांगली : पुढारी वृत्तसेवा : सांगलीतील म्हैसाळ येथे असणाऱ्या कृष्णा नदीवरील बंधार्‍यामध्ये मासेमारी करणाऱ्या मच्छीमाऱ्यांच्या गळाला कोयरा जातीचा तब्बल 40 किलोचा मासा लागला. सांगली आणि सातारा जिल्ह्यात होत असणाऱ्या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक मोठे मासे नदीपात्रामध्ये वाहून येतायेत.

आजपर्यंतचा हा सर्वात मोठा मासा

म्हैसाळ येथे मच्छीमारी करीत असणाऱ्या मच्छीमाऱ्यांच्या गळ्याला हा तब्बल 40 किलोचा कोयरा जातीचा मासा लागला. आजपर्यंतचा हा सर्वात मोठा मासा असल्याचे सांगण्यात आले.

SCROLL FOR NEXT