Murud ST Depot Problems pudhari photo
रायगड

Murud ST Depot Problems : मुरुड एसटी आगारातील मूलभूत समस्या सुटणार तरी कधी

रायगड विभागीय नियंत्रकासमोर वाचला तक्रारींचा पाढा

पुढारी वृत्तसेवा

मुरुड : मुरुड एसटी आगार अनेक मूलभूत समस्यांच्या विळख्यात सापडले असून,या समस्यांचा पाढा रायगड विभागीय नियंत्रकासमोर वाचून त्या समस्या सोडविण्याची मागणी नागरिकांच्यावतीने करण्यात आली आहे.

तहसीलदार कार्यालयात तहसीलदार आदेश डफळ यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड विभागीय नियंत्रक डाॅ.सुहास चौरे यांच्या उपस्थितीत शहवासियांनी मुरूड एसटी डेपोच्या अनेक समस्यांबाबत तक्रारीचा पाढा वाचला. चर्चेतून या समस्या सोडविण्याचे आश्वासन विभागीय नियंत्रक डॉ. सुहास चौरे यांनी बैठकीत दिले.

यावेळी ॲड.रुपेश पाटील, कुणाल सतविडकर, नगराध्यक्षा आराधना दांडेकर, नगरसेवक नितीन आंबुर्ले, माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर, मनिष माळी, अजित गुरव, श्रीकांत सुर्वे, नगरसेवक रुपेश रणदिवे, उमेश भोईर, अरविंद गायकर, ललित जैन, भावेश शहा, नगरसेवक आदेश दांडेकर, स्वप्निल कवळे, जाहिद फकजी, अनंत जोशी,अजित कासार, महेश मानकर,कुणाल जैन,राहुल कासार, सचिन शहा,किरण नाईक निखिल दांडेकर ,तारु जैन आदिंसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अन्य मुद्यांवरही चर्चा करण्यात आली.

प्रमुख प्रलंबित मागण्या

डेपो मॅनेजरांना तात्काळ कार्यमुक्त करावे., त्या जागी सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. डेपोत चांगले मेकॅनिकलची नेमणूक करावी., जेणेकरून रस्त्या गाड्या बंद पडणार नाहीत, एसटी डेपोला १० नवीन गाड्या दिल्या होत्या त्या गाड्या विविध डेपोत वळवल्या गेल्या आहेत. .त्या नविन गाड्या पुन्हा मिळाव्यात, मुरूड -अलिबाग-पनवेल थेट गाडी सुरू करावी, लांब पल्ल्याच्या गाड्या बंद कराव्यात.मुंबईला जाणाऱ्या अलिबाग व रोहा मार्ग या गाड्यांच्या संख्येत वाढ करावी., पावसाळ्याच्या आत काचा- खिडक्या फुटलेल्या ,सीट कव्हर फाटलेल्या,छंताला ओल पडलेल्या अवस्थेत असलेल्या अनेक एसटी बसेस त्वरित दुरुस्त कराव्यात.

समस्या न सुटल्यास उद्रेक

मुरूड - भालगाव- रोहा एसी (शिवशाही,शिवनेरी ) सुरू करावी. जेणेकरुन पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल. एसटी डेपोत डिझेल पंप १० वर्षांपासून बंद आहे तो तातडीने सुरु करावा. खा. सुनील तटकरे यांनी मुरूड एसटी डेपो करिता सीएनजी पंप सुरू होईल असे सांगण्यात आले असताना अजुन पर्यंत सीएनजी पंप सुरू का केला नाही.सीएनजी पंप व डिझेल पंप नसल्याने अलिबाग डेपोत सीएनजी भरण्यासाठी १ तास पेक्षा वेळ घेतला जातो.

यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.मुरूड एसटी डेपो चांगल्या फायद्यात असुन सुद्धा डेपोची दुवस्था का? अजुनही प्रवाशांना चांगल्या सुविधा पासुन वंचित राहावे लागत आहे .,अशा विविध समस्या असुन या समस्या तातडीने सोडवा नाहीतर नागरिकांचा उद्रेक होईल,असा इशाराही देण्यात आला.

यावेळी मुरुड तहसीलदार आदेश डफळ यांनी नागरिकांना बाहेर जाताना एसटी शिवाय पर्याय नाही. एस टी डेपोनी चांगली सुविधा दिलीत तर आजुन डेपोला फायदा मिळेल.असे रायगड विभागीय नियंत्रक डॉ सुहास चौरे यांना सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT