चांढवे खुर्द येथील विशाल उतेकर यांने विवाहाच्या पोशाखात येऊन मतदान केले  Pudhari
रायगड

Mahad ZP Election | 'आधी लगीन लोकशाहीचे'; बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क

Vishal Utekar Mahad | महाड तालुक्यातील चांढवे खुर्द येथील विशाल उतेकर यांनी आपल्या लग्नाआधी मतदान केले

पुढारी वृत्तसेवा

Mahad groom votes before wedding

महाड : महाड तालुक्यातील चांढवे खुर्द येथील रहिवासी असणारे विशाल उतेकर यांनी आज (दि.८) आपल्या विवाहदिनी 'आधी लगीन लोकशाहीचे' म्हणत बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावला.

तरुणांमध्ये मतदान जनजागृती होऊन मतदानाचे गांभीर्य तरुणांना कळावे यासाठी आपण आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या दिनी मतदानाला देखील प्राधान्य दिल्याचे मतदान केल्यानंतर विशाल यांनी सांगितले.

महाड तालुक्यात रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या एकूण मतदानासाठी एक लाख 39 हजार 446 मतदारांपैकी दुपारी साडेअकरा वाजेपर्यंत पुरुष 20 हजार 73 तर स्त्री 17476 मिळून 3759 मतदारांनी आपला हक्क बजावला असून याची टक्केवारी 26.93 एवढी आहे.

पोलादपूर तालुक्यातील 67 मतदान केंद्रावर सकाळ पासून शांततेत मतदानाला सुरवात

पोलादपूर तालुक्यातील 67 मतदान केंद्रावर सकाळ पासून शांततेत मतदानाला सुरवात झाली. ग्रामस्थांनी सकाळ पासून मतदान करण्यास गर्दी करत आहेत. त्यातच दुपारनंतर चाकरमान्यांची निर्णायक मते ही थेट बूथवर येणार असल्याने टक्केवारी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलादपूर तालुक्यातील विविध बूथ वर भेट दिली असताना मतदान प्रकिया शांततेत सुरू असल्याचे दिसून आले.

तालुक्यातील पलचिल बूथ वर 75 वर्षीय ज्येष्ठ वयोवृद्ध मतदार यांना व्हीलचेअर द्वारे मतदान केंद्र वर आणण्यात आले. त्याच प्रमाणे इतर बूथ वर उमेदवार अजय सलागरे , युगज्ञा उतेकर , यांनी सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावला. सकाळच्या सत्रात 67 बूथ वर 39 हजार 232 पैकी 3 हजार 780 मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. यामध्ये पुरुष मतदार 2 हजार 307 व स्त्री मतदार 1 हजार 473 मतदारांनी आपला हक्क बजावला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT