Mahad MIDC Fire | महाड औद्योगिक वसाहती मधील एमबायो कंपनीमध्ये आग!

ईटीपी प्लांट मध्ये झाली दुर्घटना!, दोन जण किरकोळ जखमी
Mahad MIDC Fire
Mahad MIDC Fire
Published on: 
Updated on: 

महाड : महाड औद्योगिक वसाहती मधील प्रतीतयश कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एमबायो कंपनीमध्ये आज सायंकाळी साडेसहा नंतर ईटीपी प्लांट मध्ये आग लागल्याची घटना घडली असून कंपनीच्या अत्यावश्यक सेवेमार्फत तातडीने सुरू केलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त झाल्याची माहिती कंपनी व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान याआधी मध्ये दोन कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली असून त्यांना महाड उत्पादक संघटनेच्या एमआयडीसी मधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे समजते. जखमी झालेल्या कामगारांची नावे शंतनुदास व सुदीप देबनाथ असल्याचे सांगण्यात आले आहे. या आगीचे वृत्त समजतात महाड एमआयडीसी फायर स्टेशन महाड नगरपालिका, लक्ष्मीआरगॅनिक, प्रिव्ही स्पेशालिटी आधी कंपन्यांच्या फायर फायटरने व स्थानिक ग्रामस्थांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीचे प्रयत्न सुरू केल्याचे दिसून आले.

यासंदर्भात औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे सपोनी जीवन माने यांनी दिलेल्या माहितीनुसार एम्बायो कंपनीमध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असूनही काही वेळातच पूर्णपणे आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य होईल असा विश्वास व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news