रायगड :विरार-अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडोरच्या मार्गिकेचे बांधकाम बोओटी तत्वावर होणार आहे. बीओटीची व्यवहार्यता अभ्यासाचा प्रस्ताव एमएमआरडीसीने काही दिवसांपूर्वी राज्य सरकारकडे सादर केला आहे. या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर बीओटी तत्त्वावर या मार्गिकेतील पहिल्या टप्प्याच्या बांधकामासाठी निविदा काढण्यात येणार आहेत. दुसरीकडे भूसंपादनाच्या कामालाही आता वेग देण्यात येणार आहे.
येत्या काही महिन्यांत 70 टक्के भूसंपादन पूर्ण करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) विरार - अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका ’बांधा वापरा हस्तांतरित करा’ (बीओटी) तत्त्वावर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने यासंबंधीच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. आता बीओटी तत्त्वानुसार हा प्रकल्प राबविण्यासाठी व्यवहार्यता अभ्यासाचा प्रस्ताव एमएमआरडीसीने 15 दिवसांपूर्वी राज्य सरकारकडे सादर केला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर बहुउद्देशीय मार्गिकेतील नवघर बलवली या पहिल्या टप्प्याच्या कामासाठी बीओटी तत्त्वावर निविदा काढण्यात येणार आहेत.
एमएसआरडीसी 126 किमी लांबीची विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका बांधणार आहे. हा प्रकल्प हाती घेऊन कित्येक वर्षे झाली तरी प्रत्यक्षात तो मार्गी लागलेला नाही. एमएसआरडीसीने या मार्गिकेतील नवघर - बलवली या पहिल्या टप्प्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरुवात करण्याची तयारी सुरू केली होती. मात्र हे कामही आता लांबणीवर पडले आहे. पहिल्या टप्प्यासाठी काढण्यात आलेल्या निविदा काही महिन्यांपूर्वी रद्द करण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात 11 पॅकेजमध्ये मागवलेल्या निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला होता.
राज्य सरकारकडून या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर बीओटी तत्त्वावर या मार्गिकेतील पहिल्या टप्प्याच्या बांधकामासाठी निविदा काढण्यात येणार आहेत. प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करण्यासाठी किमान सहा महिने लागण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भूसंपादनाच्या कामालाही आता वेग देण्यात येणार आहे. येत्या काही महिन्यांत 70 टक्के भूसंपादन पूर्ण करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे.
नवघर - बलवली पहिला टप्पा
एमएसआरडीसी 126 किमी लांबीची विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका बांधणार आहे. हा प्रकल्प हाती घेऊन कित्येक वर्षे झाली तरी प्रत्यक्षात तो मार्गी लागलेला नाही. एमएसआरडीसीने या मार्गिकेतील नवघर - बलवली या पहिल्या टप्प्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरुवात करण्याची तयारी सुरू केली होती. मात्र हे कामही आता लांबणीवर पडले आहे. पहिल्या टप्प्यात 11 पॅकेजमध्ये मागवलेल्या निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला होता.