Raigad Warehouse Fire pudhari photo
रायगड

Raigad Warehouse Fire : प्लॅटिनियम लॉजिस्टीक गोदामाला भीषण आग

धुराचे, ज्वाळांचे लोट हवेत, रहिवाशांना श्वासांचा त्रास

पुढारी वृत्तसेवा

उरण : वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील प्लॅटीनियम लॉजिस्टीक या मालाची साठवणूक करणाऱ्या गोदामाला भिषण आग लागण्याची घटना सोमवारी (दि१६) सकाळी १०-३० च्या सुमारास घडली आहे. सदर गोदामात केमिकल चा साठा असल्याने स्फोटामुळे परिसर हादरून गेला होता. गोदामात होणारे स्फोट आणि धुराचे लोट हवेत उडताना दिसत असल्याने रहिवाशांची एकच धावपळ उडाली. आगीचे नेमके कारण स्पष्ट समजू शकले नाही. सदर आगीची माहिती रहिवाशांनी अग्निशमन दलाला दिल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी सदर घटना स्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न केले आहेत.

उरण तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत हद्दीत शासनाच्या नियमांची पायमल्ली करून अनेक कंटेनर यार्ड, गोदामे उभी राहिली आहेत. या गोदामात फायर ऑडिट वारंवार प्रशासनाकडून होत नसल्याने तालुक्यातील अनेक गोदामात आगीच्या घटना घडत आहेत. त्यात सोमवारी (दि१६) सकाळी १०-३० च्या सुमारास वेश्वी ग्राम-पंचायत हद्दीतील प्लाटीनम लॉजिस्टीक यामालाची साठवणूक करणाऱ्या गोदामाला भिषण आग लागण्याची घटना घडली आहे.

या गोदामात केमिकल चा साठा असल्याने वारंवार स्फोट होत असल्याने आगीच्या ज्वाळा, धुराचे लोट हवेत उडताना दिसत होते. सदर आगीची माहिती रहिवाशांनी अग्निशमन दलाच्या जवानांना दिल्याने सिडको, पनवेल महापालिका, नवीमुंबई महापालिका येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न सुरू केले आहे.

आग कशा मुळे लागली हे कारण समजू शकले नाही. उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर हे घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी रहिवाशांना सुरक्षीत ठिकाणी जाण्यास सांगितले आहे. केमिकलच्या स्फोटक पदार्थांमुळे रहिवाशांना श्वासांचा त्रास होत असल्याचे दिसून येत होते रहिवाशांनी घट-नास्थळावरुन जाण्याचा निर्णय घेतला, सदर आगीत जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र रहिवाशांच्या घरा जवळ असलेल्या गोदामात ज्वलंतशील केमिकल साठवून ठेवण्याचा परवांनाकोणी दिला हा चर्चेचा केंद्रबिंदू ठरत असून रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

सिडको अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे प्रयत्न

आगीची माहिती मिळताच घटनास्थळी सिडको अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून, आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. कंपनीच्या परिसरातून आगीचे लोळ आणि धुराचे लोट दिसू लागल्याने परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच सिडकोअग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांकडून पाण्याचा मारा करून आग विझविण्याचे काम सुरू आहे.

कंपनीमध्ये नेमक्या कोणत्या कारणामुळे आग लागली, तसेच आगीमुळे किती नुकसान झाले आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली आहे का, याचाही तपशील समजू शकलेला नाही. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्नशील असून, आगीचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT