खोपोली : खालापूर तालुक्यातील चौक परिसरातील वावढळ येथील लीलाज फार्महाउसमध्ये बेकायदा जुगार अड्ड्यावर छापा टाकून जवळपास रोख रकम २ लाख ११ हजार ९८० सह एकूण २९ लाखांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईत ११ जणांना खालापूर पोलिसांनी ताब्यात घेत एकूण ७ वाहने जप्त करण्यात आली आहेत.
काही महिन्यांपूर्वीच रायगड पोलीस अधीक्षक पदाची धुरा आचल दलाल यांनी घेतल्यानंतर रायगड जिल्ह्यातील पोलीस दल चांगलेच ऍक्टिव्ह मोडवर आले असता यामध्ये खालापूर पोलीस ठाणे उल्लेखनीय कामगिरी करत अवैध धंद्यांना चाप बसावा म्हणून खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर पोलीस ही ऍक्टिव्ह मोडवर येत कारवाया सुरू केल्या आहेत. तर आता या कारवाईत एका मोठ्या कारवाईची भर पडली असून खालापुर पोलिसांनी अवैध जुगारच्या अड्ड्यावर १४ सप्टेंबरच्या रात्रीच्या सुमारास धाड टाकत जवळपास एकूण २९ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करत यामध्ये चार चारचाकी वाहने, तीन दुचाकी वाहने जप्त करत ११ जणांना ताब्यात घेतले असून या घटनेचा पुढील अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विशाल पवार करत आहे.
अनेक व्यक्ती आरामात व कमी वेळात जास्त पैसे मिळावे म्हणून वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करत असताना अनेक जण जुगारांमध्ये मन होत पैसे कमवण्याचा धंदा करत असताना या अवैध धंद्याना आळा बसा म्हणून खालापूर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत चौक जवळील वावटळ येथील लीलाज फार्महाउसमध्ये जात याठिकाणी तपासणी केली असता ११ व्यक्ती तीन पत्ते खेळण्यांमध्ये मग्न असताना खालापूर पोलिसांनी पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत ११ जणांना अटक करत जवळपास रोख रक्कम २ लाख ११ हजार ९८० सह एकूण २९ लाखांचा माल हस्तगत केल्याने खालापूर पोलिसांच्या या कारवाईबाबत समाधान व्यक्त होत आहे. खालापूर पोलिसांनी रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहल यांच्या आदेशाने खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
रायगड जिल्हयात यापूर्वीही जुगार अड्ड्यांवर पोलीसांनी वारंवार कारवाई करून जुगार खेळणाऱ्यांवर वचक बसविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र अद्यापही काही ठिकाणी सुरु असल्याचे खालापूर पोलीसांच्या या कारवाईवरून दिसून येते.
जुगाराच्या नादातून अनेक जण कर्जबाजारी होत अनेकांचे कुटुंब उघड्यावर पडले असता जुगाराला आळा बसावा म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. तर यापुढेही कोणी जुगार खेळण्याची माहिती मिळाल्यास त्या ठिकाणी कारवाई करत येईल. तसेच कोणत्याही ठिकाणी जुगार खेळण्याची माहिती खालापूर पोलिसांना घेण्यात यावी, त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.सचिन पवार, पोलीस निरीक्षक खालापूर पोलीस ठाणे