Uran Tadgola Demand Pudhari
रायगड

Uran Tadgola Demand: उन्हाळ्याची काहिली वाढताच उरणमध्ये ताडगोळ्यांची मागणी; दर २०० रुपयांपर्यंत

आवक कमी, मागणी जास्त; थंडगार ताडगोळ्यांसाठी ग्राहकांची गर्दी

पुढारी वृत्तसेवा

जेएनपीए : मार्च महिन्यातच प्रचंड तापमानामुळे घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. ही काहिली शमविण्यासाठी उरणमध्ये ताज्या ताडगोळ्यांची विक्री केली जात आहे. सध्या उरणच्या विविध भागात ताज्या ताडगोळ्यांची जागेवर काढून विक्री सुरू असून विशेषतः हे ताडगोळे उरण मधील स्थानिक आहेत. आवक कमी आणि मागणी अधिक असल्याने या ताडगोळ्यांचा दर 150 ते 200 रुपये डझन आहे. दर वाढला असला तरी मागणी कायम आहे.उन्हाळा मुळे पारा वाढल्याने ग्राहक आता थंडगार व सुमधुर असलेल्या ताडगोळ्या कडे वळला आहे.

फेब्रुवारी महिन्यापासून उरणच्या बाजारात ताडगोळे विक्रीसाठी येऊ लागले आहेत. सुरुवाती पासूनच प्रति डझन 150 रुपये दर आकारला जात आहे. साधारणपणे प्रति डझन 100 रुपये किंवा त्यापेक्षा कमी दरात मिळणाऱ्या ताडगोळ्यांच्या दारात वाढ झाल्याने नागरिकांनी खरेदी करतांना हात आखडता घेतला आहे. मात्र आवक वाढल्यानंतर दरात घट होईल अशी माहिती ताडगोळे विक्रेत्यांनी दिली आहे. याच काळात रसाळ आणि चविष्ट असे ताडगोळे बाजारात येतात.

उन्हाळ्यात बाहेरील वातावरणाने शरीराचे तपमान वाढते हे तापमान कमी करण्यासाठी ताडगोळे हे फळ महत्वाचे काम करते त्यामुळे या फळाला अधिकची मागणी असते. मात्र स्थानिक ताडगोळ्याबरोबरच, पालघर जिल्ह्यातील ताडगोळ्यांची विक्री केली जात आहे.

उरणमध्ये समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात ताडांची वृक्ष आहेत. या वृक्षांवर येणारी ताडांची फळे काढून त्यातून हे रसरशीत गोळे काढले जातात. अनेकदा झाडावरून फळ काढून त्याची विक्री करण्यात येते. यामुळेच याची किंमत जास्त असते.किंमत जास्त असली तर ग्राहकांचा ओढा ताड गोळा विकत घेण्याकडे वाढत असल्याचे दिसून येत आहे.

झाडांची संख्या घटतेय

उंच झाडावरून ताडगोळे काढणे जिकीरीचे काम समजले जाते.उरणच्या समुद्र किनाऱ्यावर ताडांची झाडे आहेत. या झाडांच्या माध्यमातून ताडी व ताडगोळे यांची विक्री केली जाते. मात्र सध्या या परिसरातील ताडांच्या झाडांची संख्या घटली आहे. तर या उंच झाडांवर चढून ताडगोळे काढणे धोकादायक आणि जिकीरीचे काम करणारे मजूर उपलब्ध होत नाहीत. आणि त्यांचे दर परवडत नसल्याची माहिती ताडगोळे विक्रेत्यानी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT