Illegal soil excavation Uran Pudhari
रायगड

Illegal soil excavation Uran: उरणमध्ये रात्रीच्या वेळी मातीचोरीला पेव

अवैध उत्खननामुळे शासनाच्या कोट्यवधीच्या महसुलावर पाणी

पुढारी वृत्तसेवा

कोप्रोली-उरण : उरण तालुक्यातील चाणजे, चिर्ले, वेश्वी, दिघोडे, विंधणेे, चिरनेर, कळंबुसरे, मोठी जुई, कोप्रोली, पिरकोन, सारडे, वशेणी, पुनाडे परिसरातून केवळ दिवसाच नव्हे तर रात्रीच्या वेळी देखील माती उत्खनन करण्याच्या प्रकारांचे पेव फुटले आहे. येथील अनेक ठिकाणी डोंगरांमध्ये अवैध उत्खनन सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

विशेष म्हणजे ज्या तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात त्यांच्या नाका खाली हे भूमाफिया माती उत्खनन करीत आहे, याची सुतराम माहिती देखली या अधिकाऱ्यांना नसल्याने शासनाचे कोट्यवधीचे नुकसान होत आहे.

जेएनपीए बंदर, नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू या महत्त्वाच्या प्रकल्पामुळे उरण तालुक्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे 2021 पासून विकासकांनी, भांडवलदारांनी उरण तालुक्यात विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

अनेक ठिकाणी सरकारी वनविभाग, गुरचरण, खासगी अशा जमिनीतुन माती माफिया, गाव पुढारी हे माती चोरुन विकासकाला विकत आहेत. हे माती माफिया एखाद्या खासगी जागेवर माती काढणीची परवानगी मिळवून हळूहळू बाजूच्या जमिनी, सरकारी जमिनी व गुरचरणाच्या जमिनीवरही ताव मारुन माती काढून नेत असतात. त्यामुळे जंगली प्राण्यांची आश्रयस्थाने नष्ट होण्याचा धोका निर्माण होऊन डोंगर बोडके होत आहेत.

उरणचे तहसीलदार डॉ उध्दव कदम यांनी घटनास्थळावर पाहणी करत उत्खनन झालेल्या डोंगर भागाचे मोजमाप मोजणी कार्यालयातर्फे केल्यानंतर नेमकी किती माती चोरी झाली आहे व शासनाचे किती नुकसान झालं आहे हे समजू शकेल. अवैध उत्खननामुळे शासनाच्या महसुलाचे नुकसान झाल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT