Unreserved Summer Special Train Service to Start for Chiplun
रोहे : पुढारी वृत्तसेवा
प्रवाशांच्या मागणीनुसार रेल्वे आठवड्याच्या शेवटी (शुक्रवार, शनिवार आणि रविवार) चिपळूण (कोकण विभाग) साठी ३६ अनारक्षित उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवणार आहे.
दिवा – चिपळूण- दिवा मेमू (MEMU) त्रै-साप्ताहिक अनारक्षित विशेष (३६ सेवा), गाडी क्रमांक 01159 मेमू त्रै-साप्ताहिक अनारक्षित विशेष गाडी दिनांक ०१.०५.२०२६ ते दिनांक ०७.०६.२०२६ पर्यंत दर शुक्रवार, शनिवार आणि रविवारी दिवा येथून रात्री २३.२५ वाजता सुटेल आणि चिपळूण येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ०६.३० वाजता पोहोचेल. (१८ सेवा).
गाडी क्रमांक 01160 मेमू त्रै-साप्ताहिक अनारक्षित विशेष गाडी दिनांक ०१.०५.२०२६ ते दिनांक ०७.०६.२०२६ पर्यंत दर शुक्रवार, शनिवार आणि रविवारी चिपळूण येथून १५.३० वाजता सुटेल आणि दिवा येथे त्याच दिवशी २३.१० वाजता पोहोचेल. (१८ सेवा)
या गाडीला निळजे, तळोजा पांचनंद, कळंबोली, पनवेल, सोमाटणे, आपटा, जिते, पेण, कासू, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि आंजणी हे थांबे देण्यात आले आहेत.
सामान्य शुल्कासह अनारक्षित डब्यांचे आरक्षण यूटीएस प्रणालीद्वारे करता येईल. प्रवासी तिकीट आरक्षणासाठी रेलवन ॲप देखील डाउनलोड करू शकतात. या विशेष गाड्यांच्या थांब्यांवरील सविस्तर वेळापत्रकासाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा. असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.