चिरनेर गावात दहावी पास झाल्याने मित्रांनी काढली जेसीबीवरुन मिरवणूक 
रायगड

पठ्ठ्यानं थेट जीसीबीचं काढला; दहावी पासचे केले अनोखे सेलिब्रेशन

अविनाश सुतार

उरण: पुढारी वृत्तसेवा: दहावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्यासाठी बहुतांश विद्यार्थ्यांची वर्षभर कठोर मेहनत सुरू असते. परंतु, काही विद्यार्थ्यांची केवळ पास होण्यासाठी धडपड सुरू असते. आणि नुसते पास झाले तरी त्यांचा आनंद गगनात मावत नाही. असाच एक प्रकार रायगड जिल्ह्यातील चिरनेर गावात घडला आहे. सार्थक अनंता नारंगीकर हा मित्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने गावातील मित्रांनी चक्क ढोलताशांच्या गजरात वाजत गाजत मोटारसायकल व जेसीबीवरुन मिरवणूक काढली.

सध्याची तरुण पिढी ही अभ्यासाची कास न धरता मोबाईल मध्ये आपले लक्ष केंद्रित करून आपला वेळ, आयुष्य वाया घालवीत आहे. त्यात चिरनेर गावातील सार्थक अनंता नारंगीकर हा तरुण शाळेतील अभ्यासक्रमात लक्ष न देता मोबाईल व इतर बाबींकडे लक्ष केंद्रित करत होता. त्यामुळे तो दहावीच्या परीक्षेत नापास होणार, असे त्यांच्याबद्दल मित्रांमध्ये तर्कवितर्क लावण्यात येत होते.

परंतु, सार्थकने त्यांच्या मित्रांना वचन दिले की, मी दहावीची परीक्षा उत्तीर्ण होणार आहे. नुकताच दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात सार्थक नारंगीकर या विद्यार्थ्यांला दहावीच्या परीक्षेत ५० टक्के गुण मिळवून तो उत्तीर्ण झाला. ही आनंदाची बातमी गावातील मित्रांना कळताच मित्रांनी ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत सार्थक (भाई ) नारंगीकर ची मोटारसायकल व जेसीबी वरुन मिरवणूक काढली आहे. यावेळी गावातील अनेक नागरिकांनी सार्थकचे अभिनंदन केले.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT