पश्चिम घाटातील बुरशीजन्य मातीमध्ये 2 नवीन प्रजातींचा शोध pudhari photo
रायगड

Western Ghat Aspergillus: पश्चिम घाटातील बुरशीजन्य मातीमध्ये 2 नवीन प्रजातींचा शोध

Aspergillus section Nigri: भारतीय संशोधकांनी एस्परगिलस निग्रीमधील लपलेल्या विविधतेचा केला उलगडा

पुढारी वृत्तसेवा

रायगड : जयंत धुळप

महाराष्ट्रातील पश्चिम घाटातील जैवविविधता समृद्धी ही जागतीक पातळीवरील संशोधकांकरीता एका अनन्यसाधारण आकर्षण असतानाच आता, याच पश्चिम घाटातील बुरशीजन्य मातीमध्ये दडलेल्या दोन नवीन प्रजातींचा शोध लावण्यात भारतीय संशोधकांना यश आले असून पश्चिम घाटावर पून्हा एकदा जैवसमृद्धीच्या श्रीमंतीची मोहोर उमटवली आहे.एस्परगिलस निग्रीमधील लपलेल्या या दोन नव्या प्रजाती असून त्यांची नावे एस्परगिलस- ढाकेफलकरी आणि एस्परगिलस- पॅट्रिसियाविल्टशारीया अशी आहेत.

केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या पुणे येथील स्वायत्त संस्था एमएसीएस -अघारकर संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी एस्परगिलस सेक्शन निग्री , सामान्यतः ब्लॅक एस्परगिलस म्हणून ओळखल्या जाणार्‍या या दोन नवीन प्रजातींविषयी संशोधन केले आहे. एस्परगिलस-ढाकेफलकरी आणि एस्परगिलस- पॅट्रिसियाविल्टशारीया म्हणून त्या ओळखल्या गेल्या आहेत. घनदाट वृक्षराजी असलेल्या पश्चिम घाटातून संकलीत केलेल्या मातीच्या नमुन्यांमधून दोन काळ्या स्परगिलिस ए. अ‍ॅक्युलेटीनस आणि ए. ब्रुनिओव्हायोलेसियस यांची पहिली भौगोलिक नोंद केली गेली आहे.या पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील जागेचा सतत शोध आणि संवर्धन करण्याची गंभीर गरज या निष्कर्षांवरून अधोरेखित झाली आहे. या वैशिष्ट्यपूर्ण संशोधनाचे वैज्ञानिक, पर्यावरणीय आणि जैव तंत्रज्ञानाच्या दृष्टीने मोठे महत्त्व आहे.

पश्चिम घाटातील निग्री सेक्शनमधील एस्परगिलसमधील नवीन प्रजातींचे पूर्वीचे शोध परदेशातील संशोधकांनी लावले असले तरी, हा अभ्यास मूळतः डॉ.राजेश कुमार के. सी. यांनी राष्ट्रीय बुरशीजन्य संस्कृती संग्रह, पुणे येथील अघारकर संशोधन संस्थेने (एआरआय) केला.हे शोधकार्य येथे एएनआरएफ (पूर्वीचे एसईआरबी) प्रकल्पाचा भाग म्हणून सुरू केले होते आणि एमएसीएस- एआरआय मुख्य निधीच्या मदतीने पुढे चालू ठेवला होता.

पॉलीफेसिक’वर्गीकरण पद्धतींचा वापर करुन केलेला पहिलाच अभ्यास

या संशोधनामुळे पश्चिम घाटामध्ये आढळणा-या मायकोलॉजिकल म्हणजेच बुरशीविषयीच्या अभ्यासामध्ये महत्त्वपूर्ण प्रगती दर्शवते. त्याचबरोबर अद्वितीय आणि पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण बुरशीजन्य विविधतेचा मोठ्या प्रमाणात वापर न केलेला जलाशय म्हणून या प्रदेशाची स्थिती अधोरेखित करते. भारतातील सर्वात प्रगत एकात्मिक किंवा ‘पॉलीफेसिक’ म्हणजेच बहुचरणीय वर्गीकरण पद्धतींचा वापर करून भारतीय पथकाने केलेला एस्परगिलसचा हा पहिलाच अभ्यास आहे.

पश्चिमघाट हे महाराष्ट्राचे जीवशास्त्रीय व वनस्पती शास्त्रीय दृष्टीकोनोतून मोठे आणि जागतीकपातळीवरील एकमेव असे वैभव आहे. या घाटातील बुरशीजन्या मातीचा अभ्यास सातत्याने सुरु असतोच. त्या संशोधनातून आजवर निष्पन्न प्रजातींमुळे भूतकाळाच्या अभ्यासासह भविष्याचा संशोधनात्मक वेध घेणे शक्य होत असते. आणि म्हणूनच नव्याने शोधून काढलेल्या या दोन प्रजातींना अननन्या साधारण महत्व आहे. संशोधकांचे अथक सातत्य यामध्ये महत्वाचे आहे.
डॉ.अनिल पाटील, ज्येष्ठ पर्यावरण व वनस्पती शास्त्रज्ञ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT