पोलादपूर (रायगड) : दिवाळीच्या सणानंतर कार्तिक एकादशीनंतर तुळशी विवाहाला सुरुवात होत असते, ती त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत. या दिवसात घरोघरी तुलशी वृंदावन सजवत ऊसाची कांडी व साहित्याने विवाह लावण्यात येत आहे. यासाठी बाजारात ऊस कांडीसह पूजेच्या साहित्याने बाजारपेठ सज्ज झाली आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात आजही अंगणात तुळशीचे वृंदावन असते. परंपरेनुसार लग्न व पूजा आजही केली जाते. २ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबर त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करता येणार आहे.
या विवाहनंतर हिंदू संस्कृती नुसार लग्नसोहळ्याला सुरवात होत असते. आजही ग्रामीण भागाप्रमाणे शहरी भागात सायंकाळी ६ ते ७.३० च्या दरम्यान तुळशीचा विवाह साजरा करण्यात येत आहे. आजही तुळशी विवाहाची आख्यायिका सांगितली जाते. बाजारपेठेमध्ये उसाची कांडीसह पूजेचे साहित्य उपलब्ध असल्याने महिला वर्ग खरेदी करत आहेत. या तुळशी विवाहनंतर लग्न सराईला सुरुवात होत असल्याने बाजारपेठ सज्ज झाली आहे. मोठ्या शहरात इमारती अथवा सोसायटी मध्ये तुळशी वृंदावन नसल्याने अनेक महिला प्लास्टिकसारख्या कुंड्या खरेदी करत आहेत. त्याच प्रमाणे रोपही विक्रीला उपलब्ध आहेत.
तुळशी विवाह हा श्रीविष्णूशी विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे. कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे. कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस ही दिवाळी असते.
अशी श्रद्धा आहे की, या दिवशी श्रीविष्णू झोपेतून जागे होतात आणि चतुर्मास संपतो. विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात. हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची रूढी आहे. हिंदु धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळस ही भारताच्या सर्व प्रांतांत व सर्व भागांत उगवणारी वनस्पती बहुतेक हिंदू कुटुंबांच्या अंगणात तुळशी वृंदावन असते.
मंगलाष्टके म्हणून विवाह संपन्न होतो
घरातील तुळशी वृंदावनाची- तुळशीचे रोप असलेल्या कुंडीची-गेरू व चुन्याने रंगरंगोटी करतात, सजवितात. त्यावर बोर, चिंच, आवळा, कृष्णदेव सावळा असे लिहितात. बोरं, चिंच, आवळा त्यात ठेवतात. कुटुंबातील कर्ता माणूस स्नान करून तुळशीची आणि कृष्णाची पूजा करतो. नंतर त्यांना हळद व तेल लावून मंगल स्नान घालतो. तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात व त्यावर मांडव म्हणून उसाची खोपटी ठेवतात. पूजेचे उपचार समर्पण करून विष्णूला जागे करतात व त्यानंतर बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो.
उसाची खोपटी
कुटुंबातील कर्ता माणूस स्नान करून तुळशीची आणि कृष्णाची पूजा करतो. मांडव म्हणून उसाची खोपटी ठेवतात. पूजेचे उपचार समर्पण करून विष्णूला जागे करतात व त्यानंतर बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो.