Trekking in Matheran is becoming dangerous
माथेरान : मिलिंद कदम
निसर्गाचे वरदान लाभलेल्या माथेरानमध्ये ट्रेकिंगसाठी दरवर्षी हजारो ट्रेकर्स येत असतात.पण अपुर्या माहितीच्या?आधारे त्यांचा ट्रेकिंगचा प्रवास धोक्याचा बनण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. यासाठी ट्रेकिंगला येणार्यांनी आधी माथेरानच्या परिसराचा अभ्यास करणे गरजेचे आहे.तो केल्याशिवाय ट्रेकिंग येणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे.
गेल्याच आठवड्यात माथेरान जवळ पेब किल्ला येथे काही नवशिके तरुण ट्रेकिंगसाठी गेले होते कोणत्याही प्रकारचा ट्रेकिंगचा अनुभव पाठीशी नसताना फक्त मौजमजा करण्यासाठी अशा ठिकाणी गेलेल्या तरुणांना वाट चुकल्यामुळे आपल्या जीव धोक्यात घालावा लागला होता, माथेरान मधील सह्याद्री निसर्ग रेस्क्यू टीमने या तरुणांना सुखरूप बाहेर काढले होते. त्यामुळे ट्रेकिंगला जाताना त्या परिसराची माहिती व अपेक्षित ट्रेनिंग असणे महत्त्वाचे आहे कारण पावसाळ्यामध्ये होणारे निसरडे रस्ते व गवत सर्वत्र असल्याने वाट चुकण्याचे प्रमाणे वाढत असते व त्यामुळे जीवास धोकाही निर्माण होत असतो.
पावसाळी पर्यटनाचा बेत करत असाल तर त्या ठिकाणचे सर्व माहिती उपलब्ध असणे गरजेचे आहे व त्याकरिता माथेरान मध्ये माथेरान पोलिसांनी एक मोहीम सुरू केली असून केव्हाही कुठे माथेरान परिसरात गरज असल्यास पोलीस खाते तत्पर असणार असल्याचे येथील एपीआय अनिल सोनोने यांनी सांगितले.
सर्वात महत्त्वाचे आपण ज्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणची भौगोलिक माहिती काही आपत्कालीन परिस्थिती तर आवश्यक ते टेलीफोन नंबर त्या ठिकाणी मोबाईल साठी नेटवर्क आहे का की आपण दुसर्यांची संपर्क साधू शकतो अशी माहिती न घेताच अनेक जण या ट्रिप टाकत असतात व अपघातास आमंत्रण देतात त्यामुळेच माथेरानला येण्यापूर्वी या सर्व गोष्टीचा विचार करावा. आपत्कालीन स्थिती उद्भाविल्यास दामोदर खतेले(माथेरान पोलीस स्टेशन) 83799 79761, सुनील कोळी 91 77983 33450 संपर्क साधावा.
परंतु जे हौशी पर्यटक आहेत त्यांनी हा टाळलेलाच बरा. अशा अनेक वाटा पावसाळी पर्यटनासाठी हौशी गिर्यारोहक शोधत असतात पण रस्त्यांची संपूर्ण माहिती नसल्याने अनेकांना अपघातास सामोरे जावे लागते त्यात प्रामुख्याने अनेक जण निसरड्या वाटेने जाण्यासाठी लागणारे साहित्य बरोबर नेत नसल्याचे निदर्शनास येत आह. काही स्वतःबरोबर प्राथमिक उपचाराचे साहित्य बरोबर ठेवत नाही तर निसरड्या वाटेवरून चालण्यासाठी लागणारे ट्रेकिंग शूजही न वापरता अशा ठिकाणी गेल्यानंतर अपघातास आमंत्रण देत असतात.
पनवेल येथून माथेरान करिता धोधानी पर्यंत बस सेवा उपलब्ध आहे. तिथून पुढे माथेरान करिता दोन पायवाटा आहेत. त्यातील मंकी पॉइंट येथून येणारी वाट ही पावसाळ्यात अती धोकादायक आहे. त्यामुळे हौशी गिर्यारोहकांनी ही वाट न पकडता सनसेट पॉईंट येथे येणारी कमी धोकादायक वाटेने आल्यास अधिक सोपे जाते.
चौक येथून ही माथेरान करिता दोन रस्ते येतात त्यातील एक थेट वन ट्री हिल पॉइंट येथे येतो तर दुसरा रामबाग पॉइंट येथे येता. नेरळ येथून पेब किल्ला फिरून माथेरान हा ही एक मार्ग सध्या पर्यटकांचे आवडते ठिकाण ठरत आहे. भिवपुरी येथून येथील गारबट पॉइंट हा ही एक अतिशय अवघड ट्रेक उपलब्ध आहे.