

Political war between Shiv Sena and NCP
रायगड : पुढारी वृत्तसेवा
रायगडमध्ये खा.सुनील तटकरे आणि रोहयो मंत्री भरतशेठ गोगावले यांच्यातील राजकीय वॉर चांगलेच रंगले असून, परस्परांवर केलेल्या आरोप,प्रत्यारोपांमुळे रायगडच्या राजकारणात महायुतीत ठिणगी पडल्याचे बोलले जाते.शिवसेनेच्या आमदारांनी तटकरे यांचा उल्लेख औरंगजेबाची औलाद असल्याचा उल्लेख करत ही ब्याद आता कायमची हद्दपार करायची वेळ आल्याचे सूचक वक्तव्य केले.या टीकेला खा.सुनील तटकरे यांनी कोणतेही प्रत्युत्तर दिलेले नाही.
गेल्या महिन्यात महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.यावेळी खा.सुनील तटकरे यांनी खांद्यावर नॅपकिन टाकून मंत्री गोगावले यांची मिमिक्री केली होती.त्या मिमिक्रीला रविवारी मंत्री गोगावले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. आपल्या नॅपकिन संदर्भात मिमिक्री करणार्यांना नाव न घेता या नॅपकिन मध्ये गोरगरिबांचे आशीर्वाद असल्याचे स्पष्ट करून आम्हाला दिवसण्याचे पाप करू नका असे सांगून आम्ही कोणाला पाय लावत नाही पण लावले तर सोडत नाही अशा सूचक शब्दात आपले मत व्यक्त केले.
आ.महेंद्र थोरवे यांनी तटकरेंचा उल्लेख औरंगजेबाची औलाद असा केला. खासदारकीच्या निवडणुकीत आम्ही त्यांना निवडून आणले मात्र आठ दिवसांपूर्वीची मिमिक्री पाहिल्यानंतर त्यांची उलटी गिनती सुरू झाल्याचे मत प्रदर्शित केले . तुम्हाला जागा दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही असे स्पष्ट सिंचन फाईल अजून बंद झालेली नाही याची आठवण ठेवावी असा सूचक इशारा दिला.
अलिबागचे आम.महेंद्र दळवी यांनीही आगामी निवडणुकांमध्ये भाजप सेना युती कायम राहील. राष्ट्रवादीशी कोणत्याही पद्धतीचा संबंध राहणार नाही या कामी कोणाचेही आदेश पाळले जाणार नाही अशा शब्दात आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली. खासदार तटकरे हा रायगडचा कलंक असून आता होणारी युद्ध हे आरपार खेळण्याचे आहोत. तटकरे यांना रायगडच्या राजकारणातून हद्दपार करण्याचे दिवस आल्याचे मत प्रदर्शित केले.
खासदारकीला तटकरे यांना मदत केली करून आपण चूक केली, रायगडची ही ब्याद बाहेर काढूनच आता विश्रांती घेऊन असे मत त्यांनी प्रदर्शित केले. भाजपचे विधान परिषद सदस्य हा प्रवीण दरेकर यांनी रायगडची व महाडची भूमी कोणी अंगावर आल्यास शिंगावर घेण्याची असल्याचे सांगून हे मातीचे गुण असल्याचे त्यांनी मत प्रदर्शित केले.