Poladpur Kapade Kamathe Road Blocked
पोलादपूर : तालुक्यातील कापडे कामथे रस्त्यावरील बोरज हद्दीत व गोपाळवाडी जवळ रस्त्यावर झाड पडून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. आपत्ती निवारण कडून तत्काळ जेसीबी पाठवून कार्यवाही करण्यात आल्याने रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला आहे.
पोलादपूर तालुक्यात गेली आठ दिवस सतत कोसळणाऱ्या पावसाने थोडीफार उसंत दिली आहे. मात्र, मंगळवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या धुवाधार पावसात कपडे ते कामठे रस्त्यावर झाडे उमळून पडल्याने रस्ता काही काळ वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र, आपत्ती निवारण मार्फत जेसीबी पाठवून तात्काळ वाहतूक सुरळीत करण्यात आली.
दरम्यान, साखर ते खडकवाडी रस्त्यावर फुटभर चिखल झाला असून या मार्गावरही वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन प्रवासी जनता व स्थानिक नागरिकांतून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. पावसाचे दिवस असल्याने आपत्ती निवारण सह संबंधित यंत्रणेकडून ग्रामीण रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती कडे लक्ष देणे गरजेचे बनले आहे.