The distance in relationships has increased; the number of divorce is worrisome
अलिबाग : सुवर्णा दिवेकर
घटस्फोटाचे प्रमाण सध्या वाढत चालले आहे. हुंडाबळी आणि कौटुंबिक हिंसाचारासारख्या प्रकरणात अनेक महिलांना न्यायासाठी वणवण भटकावे लागते. काही वेळा त्यांना आपला जीवही गमवावा लागतो. मात्र योग्य वेळीच मार्गदर्शन आणि समुपदेशन मिळाले तर काहीच संसार वाचू शकतो. अथवा ती महिला शाररिक व मानसिक छळापासून वाचू शकेल. यासाठी रायगड पोलिसांनी भरोसा सेल सुरू केला आहे. यामध्ये कौटुंबिक कलहाच्या प्रकरणांमध्ये समेट घडवून आणला जात आहे. जानेवारी 2024 ते एप्रिल 2025 या वर्षात एकूण 135 तक्रारी दाखल करण्यात आल्या. मात्र, यापैकी केवळ 13 प्रकरणांमध्ये पती- पत्नीचा समेट घडवून आणण्यात यश आले आहे.
कौटुंबिक हिंसाचारात घट व्हावी म्हणून प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला सेल सुरू करण्यात आले आहेत. लैंगिक शोषण किंवा अन्य प्रकारच्या हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिला अथवा मुलीला न्यायासाठी दारोदार फिरावे लागते. बलात्कार पीडित महिला अथवा मुलीला समाजासोबतच अनेकदा नातेवाईकांकडूनही तिरस्काराची वागणूक मिळते. त्यामुळे अशा पीडित महिलांना न्याय देण्याचे कामही भरोसा सेलकडून करण्यात येत आहे. जानेवारी 2024 ते एप्रिल 2025 या वर्षात एकूण 135 तक्रारी दाखल करण्यात आल्या.
त्यापैकी 104 जोडप्यांचे समुपदेशनही करण्यात आले. त्यानंतर तडजोडीअंती 13 जणांमध्ये समेट घडवून आणण्यात भरोसा सेलला यश आले आहे. यामध्ये अर्जदाराच्या विनंतीवरून 18 गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.
महिलांप्रमाणेच भरोसा सेल पुरुषांनादेखील मदतनीस ठरत आहे. हैदराबादच्या धर्तीवर महाराष्ट्रात भरोसा सेलचा प्रयोग प्रथमच नागपुरात राबविला होता. याला नागपूरकरांचा प्रतिसाद मिळाल. याच धर्तीवर रायगड जिल्ह्यात भरोसा सेल सुरू करण्यात आला आहे. भरोसा सेलमध्ये दाखल करण्यात आलेल्या तक्रारींचा अभ्यास करून तक्रारदारांना समुपदेशन करण्या आले. तक्रारदार व समोरील व्यक्तीचे म्हणणे ऐकून दोघांनाही जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली. पीडित महिला आणि मुलांना सर्व प्रकारची मदत व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातात. यामध्ये वैद्यकीय सेवा, मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशन, कायदे तज्ज्ञ, संरक्षण अधिकारी आणि पुनर्वसन सेवा तात्काळ पुरवल्या जातात. जेणेकरून संकटात सापडलेल्या महिलांना आणि मुलांना त्यांच्या समस्यांचे निराकरण लवकर करता येते.घरात वेळ न देणे, सतत मोबाइलचा वापर, एकमेकांमधील गैरसमज ही नवरा - बायकोतील भांडणाची मुख्य कारणे आहेत. यामुळे नात्यामध्ये दूरावा निर्माण होत आहे.
उत्कर्षा देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक भरोसा सेलभरोसा सेल हे आठवड्याचे सातही दिवस चोवीस तास खुले असून 100 हा हेल्पलाईन क्रमांक मदतीसाठी देण्यात आला आहे. कोर्टात जाण्यापूर्वी समुपदेशाने दोघांमधील समज गैरसमज दूर व्हावे या मधील मुख्य उद्देश असतो. भरोसा कक्षात विशेष बालपथक सेवा, ज्येष्ठ नागरिक कक्ष, बडी कॉप, पोलीस काका यांचीही नेमणूक करण्यात येते.