Mahad Tempo Rickshaw Accident
रोहित पोरे
वाळण : राज्य मार्गावर मंगळवारी भीषण अपघात झाला. भरधाव टेम्पोचे उतारावर नियंत्रण सुटलेल्या भरधाव टेम्पोने विरुद्ध दिशेने येणाऱ्या रिक्षेला धडक दिली. यात दोन जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबई येथे उपचारासाठी नेण्यात आले.
मिनी डोअर रिक्षाचालक सुधीर गीजे हे मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास महाड येथून विन्हेरे गावाकडे जात होते. बिज घर गावाजवळ दापोलीकडून मुंबईकडे येणाऱ्या टेम्पो चालकाचे उतारावर गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्याने विरुद्ध दिशेने येणाऱ्या सुधीर गीजे यांच्या रिक्षेला जोरदार धडक दिली.
या अपघातात रिक्षेत प्रवास करणारा मंथन रवींद्र भिलारे या 13 वर्षीय मुलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर श्रद्धा श्रीकांत मापुस्कर (वय 60) यांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या अपघातात आणखी सहा जण गंभीर जखमी झाल आहेत.
जखमी प्रवाशांची नावे खालीलप्रमाणे आहे:
१) राजेंद्र सखाराम भिलारे ( राहणार- शिरवली, वय – 35 वर्ष)
२) अर्चना रुपेश धोत्रे (राहणार- महाड, वय- 27 वर्ष)
३) रियांश अभिषेक रेडीज (राहणार – दहिसर, मुंबई, वय 7 वर्ष)
४) सुधीर गंगाराम गीजे (राहणार- विन्हेरे, वय 39 वर्ष)
५) श्रीकांत विठोबा मापुस्कर (राहणार – विन्हेरे, वय 65 वर्ष)
६) श्रेयशी अभिषेक रेडीज (राहणार- विन्हेरे, वय ३७ वर्ष)
या अपघातानंतर टेम्पो चालक गाडी सोडून पळून गेला आहे याबाबत महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक तपास करीत आहेत.