माणगाव : ताम्हिणी घाटातील रस्त्याचे रुंदीकरण करण्याबाबत दै. पुढारीने सतत याबाबत आवाज उठवला आहे. रस्त्याकडेल असणाऱ्या धोकादायक गरडींना तारेचे वेटोळे, कुंपण करणे, ज्या ठिकाणी मोडकळीस झालेले संरक्षित कठडे आहेत ते पुन्हा नव्याने बांधणे, याची दुरुस्ती देखभाल करणे, जिथे सुरक्षित कठडे नाहीत तेथे संरक्षित कठेडे उभारणे, अशी विविध कामे करणे गरजेचे आहे.दोन दिवसांपूर्वी झालेल्या या भीषण अपघातामुळे हा मुद्दा पुन्हाऐरणीवर आला आहे.
या धोकादायक वळणांची पुनर्रचना करून तीव्र उतार व अवघड वळणे काढून टाकावीत. शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून हा मार्ग सुरक्षित करावा, त्या ठिकाणी दिशादर्शक फलक व सूचना फलक नाही तेथे फलक लावणे गरजेचे आहे.
अवघड उतार व वळणांचा घातक प्रवास
रायगड जिल्ह्याच्या हद्दीपासून ताम्हिणी घाटातील कोंडेथर गावापासून पुढे गोका गोल्ड व्हॅली कंपनीपर्यंतचा रस्ता हा तीव्र उतार, अरुंद व अवघड वळणांनी भरलेला अतिशय धोकादायक घाटमार्ग आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने सन 2000 - 2001 मध्ये हा रस्ता सुरू करून कोकण ते पुणे मार्गाला महत्त्वाची जोड दिली असली, तरी जटिल भौगोलिक परिस्थितीमुळे हा रस्ता आजही अपघातप्रवण ठरतो
कोकणासाठी दुवा
हा मार्ग कोकण पर्यटनाचा प्रमुख दुवा असून पुण्यासोबत व्यापार, शिक्षण व पर्यटन यांना चालना देणारा आहे. त्यामुळे या मार्गावरून मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वर्दळ असते.मात्र गेल्या काही महिन्यांतील दोन गंभीर अपघातांनी या मार्गाची भीषणता पुन्हा एकदा स्पष्ट केली दरडीतील दगड कोसळून एका महिला पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू, खाजगी बस पलटी होऊन सहा प्रवाशांचा जीव गेला आहे. अवघड, तीव्र उतार व चुकीच्या कोनातील वळणांमुळे अनेक वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज लागत नाही.