महाड ः श्रीकृष्ण द. बाळ
ऐतिहासिक काळापासून महाडचे वैभवात आपल्या उद्योग धंट्याने भर घालणार्या व महाडचे नाव व्यापारी क्षेत्रात सातासमुद्रापार नेणार्या त्वाष्टा कासार समाजाच्या कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणार्या ’श्री कालिका मातेचे’ महाडमध्ये असेलेले मंदिर या समाजातील बांधवांसह महाडमधील सर्व भाविकांकरीता एक श्रद्धचे ठिकाण बनले आहे.
पश्चिम बंगालमधील रौद्र स्वरुपात असलेल्या ’श्री कालिका मातेच्या’ अंशाचा महाडची ’श्री कालिका माता’ भाग असून ही माता मात्र शांत स्वरुपाची म्हणून भाविकांमध्ये ज्ञात आहे. श्री कालिका माता हे महाडमधील एक जागृत देवस्थान असून सन 2000 पर्यंत जुन्या पद्धतीच्या मंदिरामध्ये असलेली ही देवता त्यानंतर समाजातील सर्वांनी घेतलेल्या पुढाकाराने जिर्णोद्धारानंतर आहे. आजचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
या मंदिरा मध्ये प्रतिवर्षी होणारा नवरात्रोत्सव हा महाडकरा करीता एक सुवर्णकाळ व पर्वणी देणारा असतो. मंदिरा मध्ये अत्यंत तेजस्वी व सुबक अशी कालिका मातेची मूर्ती सर्व भाविकांना आपले मनोरथ पूर्ण करणारी माता आहे या विश्वासाने या ठिकाणी विशेष करुन गर्दी पहावयास मिळते.
मंदिरामध्ये या नवरात्रौत्सव काळामध्ये विविध प्रकारचे उपक्रम रोज हळदीकुंकू, पारंपारिक भोंडला, नऊ दिवस गरबा केल्यानंतर प्रति तीन वर्षी नवीन कमिटी स्थापन करुन या कमिटीतर्फे उत्सवाचे आयोजन करण्यात येते. या समितीतील सदस्यांशिवाय समाजातील सर्व सदस्य व तांबट आळी येथील रहिवाशी व महाडकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उत्स्फुर्तपणे या सोहळ्यामध्ये सहभागी होतात.
या नवरात्रौत्सव काळात विविध भाविक आपल्या घरातील नवस फेडण्याकरीता व नवस करण्याकरीता या ठिकाणी मोठ्या संख्येने येत असतात व श्री कालिका मातेचा प्रसाद भाली लाऊन सुखसमाधानाने व शांततेने आपापल्या घरी प्रस्थान करतात. नवसाला पावणारी माता म्हणूनच महाडकरांच्या हृदयामध्ये एक वेगळे स्थान निर्माण करुन राहिली आहे.
श्रद्धचे स्थान
महाडमधील ऐतिहासिक असणार्या मंदिरांव्यतिरिक्त श्री कालिका मातेचे हे मंदिर तेथील नीटनेटकेपणा व धार्मिक परंपरेचा केला जाणारा आदर आदी बाबींमुळे महाडमधील ग्रामस्थांसह तालुक्यामध्ये एक श्रद्धचे स्थान बनले आहे.