तळा (रायगड ) : तळा तालुका हा एक ऐतिहासिक ठिकाणे असणारा व तिर्थक्षेत्र असणारा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नवरात्रोत्सवात तळ्याची ग्रामदेवता श्रीचंडिका माता मंदिर म्हणजे प्रत्येकांनी दर्शन घ्यावे असे नवसाला पावणारे देवस्थान असून नऊ दिवस मोठ्या प्रमाणात पारंपारिक पध्दतीने देवीचा उत्सव साजरा केला जातो.
आज सोमवार (दि.22) पासून देवीचा जागर सुरू होत आहे. या नऊदिवसात आध्यात्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होऊन नऊ दिवस भक्तगणांची मोठी गर्दी होईल. येथे साऱ्या महाराष्ट्रातून भक्तगण येतात व दर्शन घेतात. तालुक्यात सार्वजनिक, खाजगी ठिकाणी मुर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे.
सार्वजनिक घट, सार्वजनिक फोटो असे प्रतिष्ठापना होणार आहे. तालुक्यातील प्रसिद्ध असे कोंडजाई माता मंदिर तळेगाव, वानस्ते येथील कालकाईमाता माता मंदिर या मंदिरांमध्ये नवरात्रोत्सव ही मोठ्या पारंपरिक व भक्तीभावाने साजरा होतो. अनेक भक्तगण दुरदूरून दर्शनासाठी येतात हेही देवस्थाने नवसाला पावणारी असून ते -थेही दर्शनासाठी गर्दी होत असते. तालुक्यात घटस्थापनेचे दिवशी सकाळी गावोगावी ग्रामदेवीचे घटस्थापन करतात तसेच कुलदैवतांचे ही घटस्थापना केली जाते.
या नवरात्र उत्सवाच्या दरम्यान भजन कीर्तन, हरिपाठ, पारंपारिक पध्दतीची वाद्य, यांचा वापर तळा तालुक्यात अधिक प्रमाणात केले जाते. त्यामुळे पारंपरिक पध्दतीं आजही जपल्या जात आहेत हे पहावयास मिळत आहे. मात्र त्याच बरोबर तालुक्यात अनेक गावात व तळा शहरात देवीची प्रतिष्ठापना मंडळामार्फत केली जाते.
आता नवरात्र उत्सवात गरबा, दांडीयाला अधिक महत्व वाढत असल्याने काही पारंपरिक पध्दती लुप्त तर होणार नाही ना असा प्रश्नही पुढे येताना दिसत आहे. नवरात्र उत्सव अनेक गावांत साजरे केले जात असताना गावची गावकी बोलवली जावून प्रथम सर्वगावत स्वच्छता अभियान राबवून एकत्रित पणे हा उत्सव गावांमधे साजरा केला जाणार आहे. सर्व गावकरी एकतेने दररोज सर्वांनी मंदिरात भजन कीर्तनासाठी यायचं हे ठरविण्यात येते यावेळी काही गावात पारंपारिक पद्धतीचे नाच घेतले जातात. हि परंपरा आजही अनेक गावांमधे सुरू आहे. एकात्मतेने हा उत्सव साजरा केला जातो.