खोपोली (रायगड) : मुंबई - पुणे जुन्या महामार्गावर कलोते गावाच्या हद्दीत मोकाट गुरांचा वावर सरार्सपणे वाढल्याने अपघाताला कारणीभूत ठरत ठरू लागला आहे. या हद्दीत जवळपास ३० ते ४० मोकाट गुरे महामार्गावर ठाम मांडत आहेत.
हा मोकाट गुरांचा महामार्गावरील वावर वाहन चालकांना धोक्याची घंटा देत असून भर पावसात वाहन चालकांना या ठिकाणी रात्रीच्या समयी ही मोकाट गुरे दिसत नसल्याने लहान-मोठे अपघात याठिकाणी घडत असल्याने सर्वजण या मोकाट गुरांच्या वावराबाबत संताप व्यक्त करत आहेत. रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी एमएसआरडीसी व आयआरबी कंपनीची असताना मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने वाहन चालकांचा जीव टांगणीला लागला आहे तर यावर संबंधित प्रशासनांना ठोस कारवाई करत मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सध्या जोर धरत आहे
या मार्गावरून दररोज हजारो वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असुन त्यातच पर्यटन स्थळे या परिसरात असल्याने या मार्गावरून पर्यटकांचीही मोठी ये- जा आहे. तर या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून त्यातच खालापुर तालुक्यात अधिक प्रमाणावर कारखाने असल्याने या कारखान्यांची अवजड वाहनेही भरधाव जात आहेत. तर रिक्षा, टेम्पो, दुचाकी, चारचाकी, एसटी, शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक नियमित असल्याने हा महामार्ग मोकाट गुरांच्या वावरामुळे दिवसेंदिवस धोकादायक बनत चालला असल्याचे पहावयास मिळत आहे.
जुन्या महामार्गावरील चौक व खालापूर फाटा दरम्यान रस्त्यावर दररोज असंख्य मोकाट गुरांचा वावर वाढल्याने ही गुरे अपघाताला कारणीभूत ठरू लागला असून या महामार्गावर अनेकदा अपघात घडत असताना संबंधित प्रशासन मोकाट गुरांच्या वावराकडे कानाडोळा करीत असल्याने वाहनचालक व प्रवासी संताप व्यक्त करत असताना या मोकाट गुरांचा बंदोबस्त करून वाहन चालकांसह प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी उपाययोजना राबवण्यात यावी अशी मागणी सध्या जोर धरत आहे.
ही मोकाट गुरे रस्त्यावर ठाम मांडून बसत असल्याने भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांना ब्रेक लावणे तात्काळ शक्य होत नसल्याने अपघाताला ही मोकाट गुरे आमंत्रण देत असल्याचे या ठिकाणी पहावयास मिळत असून ही मोकाट गुरे एखाद्या वाहन चालक व प्रवाशाच्या जीवावर एक दिवस बेतील अशी शक्यता याठिकाणी दिसून येत आहे.