विन्हेरे : महाड विन्हेरे राज्य मार्गावर चार दिवसात एकाच ठिकाणी दुसरा अपघात झाला. या अपघातात एसटी मधून प्रवास करणारे सात प्रवासी जखमी झाले. त्यांना महाड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महाड विन्हेरे राज्य मार्गावर स्वारगेट डेपोची एसटी बस विन्हेरे गावातून स्वारगेटकडे जाण्यास दुपारी ३ च्या सुमारास निघाली होती. त्याच वेळेस अवकाळी पाऊस चालू झाला. चार दिवसापूर्वी कुर्ले गावाजवळील बिजघर फाट्यावर याच ठिकाणी आयशर टेम्पो व मिनी डोअर यांच्यात अपघात झाला होता. याच ठिकाणी आज सदरच्या बसचा अपघात झाला. अवकाळी झालेल्या पावसामुळे स्लीप होवून या बसचा अपघात घडला. यामध्ये ५ प्रवासी, एसटी चालक व वाहक यांना गंभीर दुखापत झाली आहे. या सर्वांना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
खैरून निशा अहमद देवळेकर, निशा सुनील घाडगे, सुजाता सुरेश यादव, सुरेश धाकू यादव, धनश्री सुरेश यादव, मुरलीधर दिगंबर पोफळे, वाहन चालक भेकरे, वाहक जयश्री बाबू वाघमारे अशी जखमींची नावे आहेत.