ठळक मुद्दे
विशेष मुलांनी बनवलेल्या पणत्यांतून उजळणाल एक लाख दिपज्याेती
पेणच्या आई डे केअर संस्थेचा गेल्या १५ वर्षांचा राेजगाराभिमुख यशस्वी उपक्रम
सहा लाख रुपयांची आर्थिक उलाढाल, विशेष मुले झाली आत्मनिर्भर
रायगड : जयंत धुळप
समाजातील विशेष मुलांना कौशल्याधारीत रोजगाराभिमुख प्रशिक्षण दिले तर ते ती कौशल्ये अत्यंत वेगाने आत्मसात करुन स्वतःच्या पायावर उभे राहातात, हे गेल्या १५ वर्षांपासून कार्यरत पेण येथील आई डे केअर संस्थेतील विशेष मुलांनी सिद्द करुन दाखविले आहे. यंदा या विशेष मुलांनी दिवाळीकरिता विविध प्रकारच्या मेणाच्या तब्बल १ लाख पणत्या तयार केल्या असून त्या योगे घरोघर एक लाख दिपज्योती उजळणार आहेत. यंदाची या विशेष मुलांची आर्थिक उलाढाल आता पर्यंत ६ लाख रुपयांच्या घरात पोहोचली आहे.
विशेष विद्यार्थी बनले आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर
आई डे केअर या विशेष मुलांच्या शाळेतील कौशल्याधारीत रोजगाराभिमुख प्रशिक्षण योजनेतून या मुलांनी हे पणत्या तयार करण्याचे कौशल्य आत्मसात केले असून त्यातून पणत्यांची निर्मीती करित असतनाच ते आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर देखील होत आहेत. सन २०१० पासून सुरु असलेल्या या प्रशिक्षणातून अनेक विशेष मुलांनी प्रशिक्षण घेवून त्यांतील अनेकांनी आता पर्यंत स्वतःचे स्वतंत्र व्यवसाय देखील सुरु केले आहेत. यंदा संस्थेतील या दिवाळी पणती निर्मीतीच्या व्यवसायात २८ मुल आणि २९ मुली असे एकूण ५७विद्यार्थी सक्रीय सहभागी झाले आहेत.
यंदा ६ लाख रुपयांची आर्थिक उलाढाल
दिवाळीसाठी यंदा या मुलांनी एक लाख पणत्या वनवल्या असून ही आर्थिक उलाढाल ६ लाख रुपयांच्या घरातील आहे. विशेष मुलांनी तयार केलेल्या या पणत्याचे मार्केटींग देखील ही मुलेच करतात. फ्लोटिंग कॅण्डल, उरली कॅण्डल यांना बाजारात खूप मागणी आहे. आता पर्यंत मुंबई, बेलापूर , माझगाव डॉक, पनवेल,, नेक्स्स मॉल येथे या पणत्यांची आकर्शक पॅकींगमधून विक्री झाली आहे. शिकावून विद्यार्थ्याला कमीत कमी ५०० रुपये मानधन मिळते तर अनूभवी विशेष मुलाला ८ हजार ते १० हजार रुपयांपर्यंत मानधन मिळते. पणत्या बनवण्याचे हे काम वर्षभर चालते. घावूक बाजारातून पणत्या आणल्या की त्या पाण्यातून धुवून घेतल्या जातात. पावसात पणत्या लगेच सुकत नाहीत, त्यामुळे रंग त्याच्यावर बसत नाही म्हणून सर्व शिक्षक, मावशी, व काही हितचिंतक असे सर्व मिळून त्या पणत्या कापडाने पुसून घेण्याकरिता सहकार्य करतात.
विशेष मुलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन वेगळा असतो परंतू काही क्षमता जन्मतःच कमी असणे हा या विशेष मुलांचा दोष नाही. या विशेषमुलांकडे अनूकरण करणे, कौशल्य आत्मसात करणे, मुळात आपण स्वतः काहीतरी करुन त्यांतून आनंद मिळवणे अशी मानसीकता या मुलांची असते आणि तीच त्यांचे विशेष क्षमता करण्याकरिता कौशल्याधारीत प्रशिक्षण त्यांना दिले तर ती स्वतः च्या पायावर उभी राहून स्वयंपूर्ण होवू शकतात.स्वाती मोहिते, संस्थापिका, आई डे केअर संस्था, पेण
पणत्या तयार करण्याकरिता आलेले सामान उतरवून घेण्याचे काम हे विद्यार्थीच करतात. पणत्या पुसून झाल्यानंतर टेबलवर विद्यार्थी त्या लावून घेतात.काही पालक काही मुलं रंग काम करतात. काही विद्यार्थी व्याक्स (मेण) पणत्यांमध्ये ओतण्याचे कौशल्यपूर्ण काम करतात. आधी पाव पणती मध्ये वॅक्स ओतले जाते आणि ते सेट झाल्यानंतर पुन्हा कोमट वॅक्स त्यामध्ये ओतले जाते. प्रणय,मानसी, योगिता, निकिता आणि नंदा हे विद्यार्थी या कामात तरबेज झाले असून ते हे काम करताना थकत नाहीत.
शिक्षक, मावशी, काही पालकांचाही सहयाेग
दरम्यान पणत्या बनवण्याचे हे काम वर्षभर चालते. घावूक बाजारातून पणत्या आणल्या की त्या पाण्यातून धुवून घेतल्या जातात. पावसात पणत्या लगेच सुकत नाहीत, त्यामुळे रंग त्याच्यावर बसत नाही म्हणून सर्व शिक्षक, मावशी, काही पालक व काही हितचिंतक असे सर्व मिळून त्या पणत्या कापडाने पुसून घेण्याकरिता सहकार्य करतात. पणत्या तयार करण्याकरिता आलेले सामान उतरवून घेण्याचे काम हे विद्यार्थीच करतात.
वॅक्स फिलींगचे काैशल्यपूर्ण काम
पणत्या पुसून झाल्यानंतर टेबलवर विद्यार्थी त्या लावून घेतात. काही मुलं रंग काम करतात.काही विद्यार्थी व्याक्स (मेण) पणत्यांमध्ये ओतण्याचे काैशल्यपूर्ण काम करतात. आधी पाव पणती मध्ये वॅक्स ओतले जाते आणि ते सेट झाल्यानंतर पुन्हा कोमट वॅक्स त्यामध्ये आेतले जाते. प्रणय, मानसी, योगिता, निकिता आणि नंदा हे विद्यार्थी या कामात तरबेज झाले असून ते हे काम करताना थकत नाहीत. त्यांना अन्य कामाकरिता सुयोग, वैभव, शारदा, सरिता,प्राची, सुभद्रा, नम्रता असे अनेक विद्यार्थी खूप मन लावून सहकार्य करतात. तयार पणत्यांचे बॉक्स पॅकिंग करणं, एकावर एक रचणे, प्रत्येक पणती टिशू पेपर मध्ये पॅक करून मग ती बॉक्समध्ये भरली जाते. सुंदर पॅकिंग सुद्धा विद्यार्थी आणि विशेष सहशिक्षिका करतात. मेणाच्या मोठमोठ्या लाद्या असतात. त्याचे तुकडे करून ,बारीक करून ते ड्रम मध्ये भरून ठेवण्याचे काम देखील विद्यार्थीच करतात.
४९ वर्षांची नंदाताईंचा उत्साही सहभाग
४९ वर्षाच्या नंदाताई काम काम करताना खुश असतात तर त्यां इतर मुलांना प्राेत्साहन देखील देतात. पेपर बॅग तयार करणे, पणत्या पुसणे, रंगवणे, बॉक्स भरणे,सॉर्टिंग करणे, खराब झालेल्या पणत्या वेगळ्या करणे, या सगळ्या गोष्टी त्या आनंदाने दिवसभर न थकता करत असतात.