महाड : महाड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा समन्वयक व शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सोमनाथ ओझरडे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी दिलासा प्राप्त झाला असून न्यायालयाने त्यांना 9 फेब्रुवारी पर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
या संदर्भातील हकीगत अशी की एक जानेवारी रोजी सोमनाथ ओझर्डे त्यांचे सहकारी अक्षय भोसले आणि प्रतीक जगताप यांनी दमदाटी करीत जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली दिनांक दोन जानेवारी रोजी त्यांच्याविरुद्ध महाड शहर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली होती .
शनिवार 17 जानेवारी रोजी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने झालेल्या सुनावणी दरम्यान सरपंच सोमनाथ ओझर्डे व त्यांच्या दोन सहकाऱ्यांची बाजू ऐकून घेत अटकपूर्व जामीनावर पुढील सुनावणी पर्यंत म्हणजेच 9 फेब्रुवारी पर्यंत त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला. या जामिनाच्या मदतीपर्यंत सोमनाथ ओझर्डे, अक्षय भोसले व प्रतीक जगताप या तिघांनाही अटकेपासून संरक्षण मिळाल्याचे या न्यायालयाच्या निकालाने स्पष्ट झाले आहे.