पनवेल- कर्जत नवीन रेल्वेस्थानकावर नवीन उड्डाण पूल उभारणार pudhari photo
रायगड

Panvel Karjat railway line : पनवेल- कर्जत नवीन रेल्वेस्थानकावर नवीन उड्डाण पूल उभारणार

खासदार-आमदारांकडून पाहाणी, प्रवाशांशी साधला संवाद

पुढारी वृत्तसेवा

कर्जत : पनवेल - कर्जत नवीन रेल्वे मार्ग तयार होत आहे. त्याची पाहणी करण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे कर्जतला आद्ययावत नवीन स्थानक होत आहे. त्याची पहाणी करण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्या समवेत आले होते. यावेळी मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे अधिकारी होते. कर्जतचे प्रवेशद्वार म्हणजे वाहतूक कोंडीचे मुख्य ठिकाण.

तेथेच रेल्वे प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी मार्ग तसेच स्थानकावर जाण्यासाठी मार्ग असल्याने या परिसरात भविष्यात प्रचंड वाहतूक कोंडी होणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत जुन्या रेल्वे पुलाच्या बाजूला नवीन रेल्वे उड्डाण पूल व्हावा. अशी भूमिका घेऊन खासदार बारणे आणि आमदार थोरवे यांनी नवीन उड्डाण पुलासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे पाठपुरावा करून तो उभारण्याचा शब्द दिला.

नव्याने होत असलेल्या कर्जत रेल्वे स्थानकाची पाहणी करण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र थोरवे, मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे अधिकारी अमरीत आनंद, योगेश शर्मा, मनीष कुमार, लक्ष्मीकांत जनपासे, माथेरानचे नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी, नगरसेवक संकेत भासे, किशोर कदम, वैभव सुरावकर, रोहित ओसवाल, माजी सभापती राहुल विशे, दिनेश कडू, प्रदीप घाडगे, पंकज ओसवाल, बजरंग श्रीखंडे, प्रथमेश मोरे आदींसह आले.

मुंबई रेल्वे विकास महा मंडळाचे अधिकारी योगेश शर्मा यांनी, कर्जत - पनवेल जुनी मार्गीका चालूच राहील. या मार्गीकेचे दुपदरी करण करण्यात येणार आहे. नवीन मार्गीकेचे व कर्जत रेल्वे स्थानकाचे काम येत्या चार - पाच महिन्यात पूर्ण होईल. असे स्पष्ट केले.

चंद्रकांत चौधरी यांनी माथेरानमधील पर्यटन वाढी साठी रोपवे करावा. अशी मागणी केली. तर पंकज ओसवाल यांनी कर्जतच्या नवीन रेल्वे स्थानकाचे उदघाट्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावे. अशी आमची इच्छा आहे. असे सांगितले.

महिलांसाठी विशेष लोकल सुरू करा

आम्ही रेल्वे प्रवाशांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न करीत असतो. कोरोना पूर्वीचे कर्जत स्थानकातील थांबे सुरु करावेत. यासाठी मी पाठपुरावा करीत आहे. महिलांसाठी विशेष लोकल सुरु व्हावी. अशी मागणी आहे. महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही मागणी रास्त आहे. त्यासाठी प्रयत्न करू. आम्ही आत्ताच पनवेल, चिखले, पोयंजे, चौक रेल्वे स्थानकांची व मार्गीकेची पहाणी केली असून 85 टक्के काम पूर्ण झाले आहे. या नवीन मार्गीकेच्या व स्थानकांमध्ये असलेल्या त्रुटी दूर करून नवीन कर्जत स्थानक आद्ययावत कसे होईल. यासाठी आमचे पूर्ण लक्ष आहे. असे सांगितले.

रेल्वे स्थानकाचा आराखडा

मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे अधिकारी अमरीत आनंद, योगेश शर्मा यांनी समजावून सांगितला. यावेळी कर्जतचे जुने रेल्वे स्थानक आणि आता नव्याने उभारण्यात येणारे रेल्वे स्थानक यांना कसे जोडणार? असा प्रश्न खासदार बारणे व आमदार थोरवे यांनी विचारला. त्यावर ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. सध्या याच परिसरात वाहतूक कोंडी होत आहे.

नवीन रेल्वे स्थानक सुरु झाल्यावर येथील वाहतूक कोंडीची समस्या भयानक होईल. यावर काय उपाय आहे? या प्रश्नाला सुद्धा उत्तर देता आले नाही. त्यावर आमदार महेंद्र थोरवे यांनी येथे नवीन रेल्वे उड्डाण पुलाची आवश्यकता आहे. ते यापूर्वीच आराखड्यात घ्यायला हवे होते. असे सूचित केल्यावर ते आमच्या कडून राहिले. असे उत्तर शर्मा यांनी दिले. त्यानंतर खासदार बारणे आणि आमदार थोरवे यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे प्रस्ताव ठेऊन येथे नवीन रेल्वे उड्डाण पूल बांधण्यात येईल. त्यासाठी रेल्वे प्रशासनानेही सहकार्य करावे. असे सूचित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT