रायगड : अलिबाग एसटी बस स्थानकातून निघालेल्या शिवशाही बसने एका स्कुटी धडक देत फरफटत नेल्याने भीषण अपघात झाला. सोमवारी रात्री सव्वा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सुदैवाने या कोणतीही जीवित हानी झाली नाही.
सोमवारी रात्री सव्वा वाजण्याच्या सुमारास अलिबाग शिवशाही बस स्थानकातून एक एसटी बस निघाल्यानंतर रस्त्याच्या बाजूला उभी करून ठेवलेल्या एका स्कुटरला धडक दिली. मात्र चालकाने बस न थांबविता सुमारे तीस ते चाळीस स्कुटीला फरफटत नेले, त्यानंतर बस थांबली. असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सुदैवाने यात कोणासही इजा झाली नाही.
यासर्व गोंधळामुळे पीएनपी नगर भागात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. स्कुटीचालक आपल्या स्कुटीच्या नुकसानभरपाईची मागणी करीत होता.