शिवसेना स्वबळावर निवडणुका लढणार : गोगावले  pudhari photo
रायगड

Bharat Gogawale | शिवसेना स्वबळावर निवडणुका लढणार : गोगावले

आगामी निवडणुका शिवसेना शिंदे गट आता अन्य कोणत्या पक्षांना बरोबर घेऊन लढवितो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार

पुढारी वृत्तसेवा

महाड ः श्रीकृष्ण बाळ

काही दिवसापूर्वीच दैनिक पुढारीने रायगड जिल्ह्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना भविष्यात जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व भारतीय जनता पक्ष एकत्रितपणे येऊन काम करतील असे संकेत दिले होते. आज महाडमध्ये माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या दोन्ही पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने अनिकेत तटकरे यांनी अधिकृतपणे जिल्ह्यात या दोन पक्षांच्या युतीची आगामी निवडणुकांसाठी घोषणा केली.

या घोषणेने मागील 35 वर्षापासून परंपरागत असलेल्या मित्राची साथ आता भारतीय जनता पक्षाने भविष्यकालीन वाटचालीचा वेध घेत सोडल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान या संदर्भात प्रतिक्रिया देताना आगामी निवडणुका शिवसेना जिल्ह्यात स्वबळावर लढेल असे मंत्री भरत शेठ गोगावले यांनी स्पष्ट केले.

रायगड जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व भारतीय जनता पक्ष हे संयुक्तपणे लढणार असल्याने जिल्ह्यात आता या सर्व निवडणुकांमध्ये तिरंगी लढत बहुतांश ठिकाणी पहावयास मिळेल असे अंदाज राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त होत आहेत.

उत्तर रायगड मध्ये प्रामुख्याने महाविकास आघाडी मधून एकत्रितपणे निवडणुका लढवण्याबाबतचे घेतले गेलेले धोरणात्मक निर्णय लक्षात घेता दक्षिण रायगडमध्ये महायुती मधील पक्षांमध्येच मनभेद निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाडच्या राजकारणात मागील अनेक वर्षापासून शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी किंवा काँग्रेस अशी थेट लढत मागील चार दशकांपासून महाड नागरिक अनुभवत आहेत 1980 नंतर केंद्रातील शासनांमधून बाहेर पडल्यानंतर स्थापन केलेल्या भारतीय जनता पक्षाने जिल्ह्याच्या विविध भागात सातत्य पूर्ण पद्धतीने कार्यकर्त्यांना जोडण्याचे काम केले होते.

गेल्या एक दशकापेक्षा जास्त काळापासून भारतीय जनता पक्षाने रायगड जिल्ह्यात आपली राजकीय ताकद दाखवणे सुरू केले हेोत. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुका शिवसेना शिंदे गट आता अन्य कोणत्या पक्षांना बरोबर घेऊन लढवितो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.नगरपालिका निवडणुकांचे पडसाद आगामी जि.प. निवडणुकीतही उमटू शकतात.

शिवसेनेचाही युतीसाठी प्रस्ताव

दरम्यान यासंदर्भात मंत्री भरत शेठ गोगावले यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये आपल्या पक्षाकडूनही भारतीय जनता पक्षाला युतीबाबत चा प्रस्ताव दिला होता असे नमूद करून यादरम्यान काही झालेल्या घडामोडींमुळे त्या दोन पक्षांची युती असावी अशी शक्यता वर्तवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT