Bal Mane Pudhari
रायगड

Politial News: पनवेलमध्ये बाळ मानेंच्या विरोधात शिवसेनेचा संताप

विधानपरिषद मध्ये उमेदवारी घेवून ती उमेदवारी विरोधकांना विकून माघार घेणाऱ्या बाळ मानेंचा जोडे मारुन निषेध केला.

पुढारी वृत्तसेवा

पनवेल: पैशाच्या लालसेपोटी विकल्या गेलेल्या बाळ मानेंचा जोरदारपणे आज पनवेल येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर महिला आघाडीने निषेध करून त्यांच्या फोटोला चप्पला मारल्या. ज्या मातोश्रीने भावाप्रमाणे प्रेम दिले अशा मातोश्रीचा विश्वासघात करून कोकण विधानपरिषद मध्ये उमेदवारी घेवून ती उमेदवारी विरोधकांना विकून माघार घेणाऱ्या बाळ मानेंचा जोडे मारुन निषेध केला.

यावेळी नेते बबनदादा पाटील, प्रसाद भोईर , अनिल चव्हाण, जिल्हाप्रमुख दिपक निकम, भरत पाटील, रामदास पाटील, ॲड.समाधान काशिद, लिना गरड, शिरिष बुटाला, संदीप तांडेल, ज्ञानेश्वर बडे, शहरप्रमुख प्रवीण जाधव, यतीन देशमुख, सदानंद शिर्के, रामदास गोवारी, सुर्यकांत म्हसकर, प्रदीप केणी.

नगरसेविका प्रगती पाटील, रितीशा गोवारी, प्रिया गोवारी, मेघना घाडगे, आर्या जाधव, उत्तम मोर्बेकर, नितीन गावंड, महिला आघाडीच्या संगीता राऊत, उज्वला गावडे, ज्योती मोहिते, मालती पिंगळा, सानिका मोरे, शिवसैनिक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT