उरण आगाराने एसटी गाड्यांची संख्या वाढवावी pudhari photo
रायगड

Urun transport problems : उरण आगाराने एसटी गाड्यांची संख्या वाढवावी

शेकाप नेते शेखर पाटील यांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

जेएनपीए ः महाराष्ट्र शासनाच्या परिवहन महामंडळच्या उरण डेपोने गाड्यांच्या संख्येत वाढ करावी व सातत्याने होणाऱ्या एसटीच्या फेऱ्या रद्द करू नये यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे शहरचिटणीस शेखर पाटील यांनी डेपो मॅनेजर अमोल दराडे यांना निवेदन सादर केले.यावेळी नयना पाटील,नारायण पाटील उपस्थित होते.

यावेळी शेखर पाटील यांनी प्रवाशांच्या सेवेसाठी विविध मागण्या केल्या आहेत. उरण डेपामध्ये यात्रा सहल इत्यादी कारणास्तव सकाळच्या सत्राच्या साडेसहा वाजताची पेण, दादर , पनवेल व इतर वेळेतीली गाड्या रद्द करण्यात येतात तर कधी कंडक्टर, ड्रायव्हर येत नसल्याने गाड्या रद्द होणे तर ड्रायव्हर कंडक्टर उशिरा येत असल्याने गाड्या उशिरा सुटणे यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल होत असल्याचे निदर्शनास आणले.

यामुळे कामगार वर्गाला वेळेवर पोहोचता येत नाही यासंदर्भात प्रवाशांनी तक्रारी देऊन देखील दखल घेतली जात नाही त्यामुळे प्रवासी वर्गाला त्रास सहन करावा लागतो त्यामुळे एसटीचा प्रवासी वर्ग कमी होऊन उत्पन्नात घट होत आहे. पनवेल पेण दादर मार्गावर फेऱ्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. मात्र गाड्यांची संख्या अपुरी आहे.त्यासाठी उरण डेपोने ज्यादा गाड्या मागवण्याची गरज आहे.

डेपोतून पनवेल,दादर व पेण कडे जाणाऱ्या प्रवासी वर्गाची संख्या मोठी असून त्यामुळे नक्कीच उत्पन्नात वाढ होईल.त्याचबरोबर प्रवाशांना देखील ज्यादा बस सेवेचा फायदा होईल. उरण-पनवेल जलद गाड्या सोडण्याची आवश्यकता आहे. तसेच नवघर रेल्वे स्टेशन न्हावा शेवा रेल्वे स्टेशन इथेही गाड्या सोडण्याची आवश्यकता आहे. येथून पूर्व विभागात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्याचेही सुचित करण्यात आले आहे. करंजा व मोरा मार्गावर प्रवासी बस नियमित वेळेत सोडाव्यात तसेच विद्यार्थ्यांच्या पास साठी नऊ ते पाच ही वेळ पाळावी आदी मागण्या या निवेदनातून आगार प्रमुखांकडे करण्या आल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT