School Girls Viral Video Pudhari
रायगड

School Girls Viral Video: शाळकरी मुली बनल्या ‘रिपोर्टर’; छत्रीचा माईक करून खड्ड्यांची केली पोलखोल

कर्जत-कोंदिवडे रस्त्यावरील खड्डे आणि नागरिकांना होणारा त्रास याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी या मुलींनी पत्रकारितेची अनोखी शैली अवलंबली.

पुढारी वृत्तसेवा

रायगड: कर्जत तालुक्यातील खांडपे येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कर्जत-कोंदिवडे रस्त्यावरील खड्डे आणि नागरिकांना होणारा त्रास याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी या मुलींनी पत्रकारितेची अनोखी शैली अवलंबली.

हातातील छत्रीचा माईक म्हणून वापर करत त्यांनी रस्त्याच्या दुरवस्थेवर केलेले ‘लाईव्ह रिपोर्टिंग’ राज्यभर चर्चेचा विषय ठरले आहे. कर्जत-कोंदिवडे मार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने नागरिक, शालेय विद्यार्थी, वृद्ध आणि रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

याच समस्येला वाचा फोडण्यासाठी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनींनी एखाद्या वृत्तवाहिनीप्रमाणे घटनास्थळावरून लाईव्ह रिपोर्टिंग केले. एका विद्यार्थिनीने रिपोर्टरची, तर दुसरीने कॅमेरामनची भूमिका साकारत रस्त्याची विदारक अवस्था आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अडचणी दाखवून दिल्या. याची दखल घेत रस्त्यावर मुरूम टाकून खड्डे बुजवण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT