RTE Act free school admission pudhari photo
रायगड

RTE Admission : आरटीई प्रवेश निश्चितीसाठी मुदतवाढ, पालकांना दिलासा

सन 2026-27 प्रक्रियेदरम्यान सोडतद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्रे पडताळणी व आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी गुरुवार (ता.30) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

RTE Admissions: Deadline Extended for Admission Confirmation; Relief for Parents

अलिबाग : पुढारी वृत्तसेवा

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार दुर्बल व वंचित घटकाकरीता 25 टक्के ऑनलाईन प्रवेश सन 2026-27 प्रक्रियेदरम्यान सोडतद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्रे पडताळणी व आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी गुरुवार (ता.30) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांची कागदपत्रे तातडीने पडताळणी करून प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12 (सी) (1) नुसार दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळा या शाळांमध्ये आरटीई 25 टक्के सन 2026-27 या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे.

आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी नावनोंदणी झाल्यानंतर सोडत प्रक्रिया राबविण्यात आली होती. या सोडतीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आपल्या कागदपत्रांची पडताळणी करण्याठी व आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी 20 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र आता 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या पालकांनी आपल्या पाल्याचे कागदपत्रे पडताळणी करून आपल्या पसंतीच्या शाळेमध्ये पाल्याचा प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ललिता दहीतुले यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT