रोहे: यावर्षी पाऊस उशिरा चालू झाला. परंतु हवामान खात्याने अंदाज दिल्यानंतर या गणेशोत्सवामध्ये पाऊस पडण्याची शक्यता असल्याने यावर्षीच्या गणेशोत्सवावर पावसाचे सावट असल्याचे दिसून येत आहे. कोकणातील सर्वात मोठ्या उत्सवाला सोमवारपासून सुरुवात होत आहे.
मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांनी गणेश उत्सवाची तयारी पूर्ण केली आहे. परंतु हवामान खात्याने गणेशोत्सवा दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असल्याने यावर्षी गणेशोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
त्याची सुरुवात म्हणून रविवारी दिवसभर रोहा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात पाऊस पडला आहे. त्यामुळे बाजारपेठेत आलेल्या गणेश भक्तांची हिरमोड झालीच परंतु त्याच बरोबर दुकानदारांनाही ऐन गणेश उत्सवामध्ये फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.