Roha Police Raid Pudhari
रायगड

Roha Police Raid: रोहा पोलीस हातभट्टीच्या विरोधात ॲक्शन मोडवर; टिटवी, केळघर, धामणसई येथे हातभट्टी अड्ड्यावर धाडी

हा मुददेमाल व रसायन जंगलभागातुन वाहतुकीस अवजड असल्याने जागीच नष्ट करण्यात आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

रोहे: रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय शेलार यांनी पदभार सांभाळल्यानंतर रोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिटवी, केळघर, धामणसई या गावात गावठी हातभट्टी अड्ड्यावर धाडी टाकून मुद्देमाल जप्त केले आहे.

रोहा पोलीस ठाणे हददीतील केळघर परिसरातील जंगल भागात गावठी हातभटटीची दारू तयार करीत असल्याबाबत गोपनीय माहिती रोहा पोलिसांना मिळाल्यानंतर २२ ऑगस्ट रोजी रोहा पोलीस निरीक्षक अभय शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकला असता ११ निळया रंगाच्या प्लास्टीकच्या ड्रममध्ये एकुण २२०० लीटर गावठी हातभटटीची दारू तयार करण्याकरीता लागणारे रसायन असा एकुण १लाख१५हजार५०० रुपये किंमतीचा मुददेमाल मिळुन आला आहे.

हा मुददेमाल व रसायन जंगलभागातुन वाहतुकीस अवजड असल्याने जागीच नष्ट करण्यात आला आहे. या संबंधित तीन आरोपीतच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे कारवाई सुरू आहे.

२३ ऑगस्ट रोजी रोजी रोहा पोलीस ठाणे हददीतील टिटवी गावहद्दीमधील जंगल भागात गावठी हातभटटीची दारू तयार दारुभट्टीवर छापा टाकण्यात आला.

या ठिकाणी १२ निळया रंगाच्या प्लास्टीकच्या ड्रममध्ये एकुण २४०० लीटर गावठी दारू तयार करण्याकरीता लागणारे रसायन, ॲल्युमिनियमचा गावठी दारू गाळण्याचा सतेला व झाकणी, गावठी हातभट्टी दारू १० लिटर असा एकुण १ लाख ५७हजार रूपये किंमतीचा मुददेमाल मिळुन आला.

तोही जागीच नष्ट करण्यात आला आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही चालु आहे.रोहा पोलीस ठाणे हद्दीत धामनसई गावचे हद्दीत आरोपीच्या राहते घराचे मागील बाजूस हातभट्टी दारूची विक्री करीत असल्याबाबत माहिती मिळाली असता या ठिकाणी धाड टाकली.

या ठिकाणी १०० लिटर गावठी दारू, किंमत अंदाजे १०हजार रुपये हस्तगत करण्यात आली आहे. आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाही करीत आहोत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT