रोहे ः महादेव सरसंबे
रायगड जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या रोहा अष्टमी नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी साऱ्याच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची अर्ज दाखल करण्यासाठी भाऊगर्दी दिसून आली. मोठ्या प्रमाणात उमेदवार आपल्या समर्थकांसह दाखल झाले होते.रोहा अष्टमी नगर परिषदेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार किशोर देशमुख यांनी उमेदवारी अर्ज स्विकारले.
अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या थेट नगराध्यक्षपदासाठी शिंद शिवसेनेकडुन शिल्पा धोत्रे, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडुन वनश्री शेडगे तर ठाकरे शिवसेने कडुन नेहा गुरव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहेत. रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या 20 जागांसाठी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस, शिंद शिवसेना, ठाकरे शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष असे एकूण 78 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
आज दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांमध्ये अजित पवार राष्ट्रवादी पक्षाकडुन प्रभाग 1 मध्ये निता हजारे, प्रशांत कडु, प्रभाग क्रमांक 2 मध्ये फराह पानसरे, राजेंद्र जैन, प्रभाग क्रमांक 3 मध्ये अफरीन रोगे, अरबाझ मणेर, प्रभाग क्रमांक 4 मध्ये स्नेहा आंबरे, अहमद दर्जी, प्रभाग क्रमांक 5 मध्ये आलमास मुमैरे, महेंद्र गुजर, प्रभाग क्रमांक 6 मध्ये गौरी बारटक्के, महेंद्र दिवेकर, प्रभाग क्रमांक 7 मध्ये प्रियंका धनावडे, रवींद्र चाळके, प्रभाग क्रमांक 8 मध्ये संजना शिंदे, महेश कोलाटकर, प्रभाग क्रमांक 9 मध्ये अश्विनी पवार, समिर सकपाळ, प्रभाग क्रमांक 10मध्ये पुर्वा मोहीते, अजित मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
उद्धव ठाकरे शिवसेनेच्यावतीने प्रभाग क्रमांक 1 मध्ये सुनीता पाचंगे, मनोज लांजेकर, प्रभाग क्रमांक 2 मध्ये संजय देऊळकर, प्रभाग क्रमांक 6मध्ये बेबीताई देशमुख, राजेश काफरे, प्रभाग 10 मध्ये नेहा गुरव, ओंकार गुरव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजप कडुन प्रभाग 6 मध्ये पी.व्ही. ज्योती सनिलकुमार, प्रभाग क्रमांक 9 मध्ये रोशन चाफेकर, प्रभाग 10मध्ये स्मिता घरत, सुमीत रिजबुड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवारी अर्ज दाखल करताना खा.सुनील तटकरे, माजी आ.अनिकेत तटकरे, समिर शेडगे, अमित उकडे, महेश कोलाटकर, महेंद्र गुजर, राजेंद्र जैन, अहमद दर्जी उपस्थित होते. शिंदे शिवसेना उमेदवारांचे अर्ज दाखल करताना तालुकाप्रमुख मनोजकुमार शिंदे, लालताप्रसाद कुशवाह, अशोक धोत्रे, उस्मान रोहेकर, नितीन तेंडुलकर, शहर अध्यक्ष मंगेश रावकर, शहर अध्यक्षा ॲड. मयूरा मोरे, प्रकाश कोळी, आशिष स्वामी उपस्थित होते.
उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करताना उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे तालुका प्रमुख नितीन वारंगे, विष्णु लोखंडे, सचिन फुलारे, यतीन धुमाळ, रमेश विचारे, राजेश काफरे तर भारतीय जनता पार्टीचे अर्ज दाखल करताना तालुका अध्यक्ष अमित घाग, रोशन चाफेकर, रिया कासार उपस्थित होते.